
क्रिकेट हा बेभरवसाचा खेळ आहे. यात कधी काय होईल हे सांगता येत नाही, असं म्हटलं जात. त्याची प्रचिती आज पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्यसमध्ये झालेल्या सामन्यादरम्यान आली. सर्वात कमी धावसंख्या करूनही पंजाबच्या शेर खेळाडूंनी कोलकाताच्या शिलेदारांना फक्त ९६ धावांत गारद केलं.
चंदीगडमधील मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाता संघ ११२ धावांचा पाठलाग करू शकला नाही. पंजाबच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या केकेआरचा संघ अवघ्या ९६ धावा करू शकला. पंजाब संघाने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येचा बचाव केला. यापूर्वी २००९ मध्ये चेन्नई आणि पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण ११६ धावांचा बचाव झाला होता.
या सामन्यात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पंजाब २० षटकेही फलंदाजी करू शकला नाही आणि १६ व्या षटकात १११ धावांवर सर्वबाद झाला. हर्षित राणाने ३ तर वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण पंजाब संघाने १६ व्या षटकात गाशा गुंडाळला. पंजाबचं माफक आव्हान आपण सहजपणे पूर्ण करू, असं केकेआरच्या खेळाडूंना वाटलं होतं. परंतु हार मानतील ते पंजाबचे शेर कसले, त्यांनी कमी धावा केल्या असल्या तरी केकेआरला गुघडे टेकण्यास भाग पाडलं. पंजाबच्या गोलंदाजांनी केकेआरला एकानंतर एक धक्के दिले.
लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात मार्को जॅन्सनने सुनील नरेनला बाद केले. दुसऱ्या षटकात क्विंटन डी कॉकही बाद झाला. ७ धावांत दोन विकेट गमावल्यानंतर, अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. दोघांनीही संघाचा धावसंख्या ५० च्या पुढे नेला. कर्णधार अजिंक्य रहाणे (१७) बाद झाला तेव्हा आठव्या षटकात केकेआरची स्थिती ६२ धावांवर होती. त्याला युजवेंद्र चहलने एलबीडब्ल्यू घोषित केले. यानंतर केकेआरची पडझड सुरू झाली.
३७ धावा काढल्यानंतर चहलच्या चेंडूवर अंगकृष बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलने व्यंकटेश अय्यरची विकेट घेतली. चहलने रिंकू सिंग आणि रमनदीप सिंग यांना सलग चेंडूंवर बाद करून केकेआरची धावसंख्या ७ बाद ७६ अशी केली. हर्षित राणाही ७९ धावांवर बाद झाला. आंद्रे रसेलने चहलविरुद्ध एका षटकात १६ धावा केल्या. आता केकेआरला विजयासाठी १७ धावांची आवश्यकता होती आणि ६ षटके शिल्लक होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.