PBKS vs KKR: रमनदिप सिंह बनला सुपरमॅन; झेप घेत हवेतच टिपला झेल

PBKS vs KKR : पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आमनेसामने आले आहेत.
PBKS vs KKR:  रमनदिप सिंह बनला सुपरमॅन;  झेप घेत हवेतच टिपला झेल
Published On

आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्ज संघातील फलंदाज सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार श्रेयस अय्यर आणि तरुण सलामीवीर प्रियांश आर्य सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करत आहे. प्रियांशने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध शतक झळकावले होते. गेल्या सामन्यात अय्यरने हैदराबादविरुद्ध स्फोटक फलंदाजी केली होती. परंतु आजच्या केकेआरच्या संघाविरुद्धात पंजाबचे किंग्स अपयशी ठरले.

पंजाब किंग्जने केकेआरविरुद्ध धमाकेदार सुरुवात केली. ३ षटकांनंतर संघाचा स्कोअर ३३ धावा होता. कर्णधार अजिंक्य रहाणेने हर्षित राणाला चौथं षटक टाकण्यास दिली. प्रियांश आर्यने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. पण त्याचा डाव दुसऱ्या चेंडूवर संपला. प्रियांशने पुल शॉट खेळला त्यात तो फेल ठरला. चेंडू बॅटच्या वरच्या काठावर आदळला आणि फाइन लेगवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या रमणदीप सिंगच्या हातात गेला.

प्रियांशने १२ चेंडूत २२ धावा केल्या. त्यानंतर मैदानावर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर फलंदाजीसाठी आला. पण हर्षित राणाने त्याला शु्न्यावर बाद केलं. श्रेयसने फाइन लेगकडे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण बॅट आणि चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. त्यामुळे श्रेयस झेल बाद झाला. रमनदिपने पुढे झेप घेत श्रेयसचा झेल घेतला. त्याच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालाय.

पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर आला. गेल्या हंगामात तो केकेआरचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली संघ चॅम्पियनही बनला. पण श्रेयस अय्यरला त्याच्या जुन्या संघाविरुद्ध खातेही उघडता आले नाही. हर्षित षटकात ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो अपयशी ठरला.

हर्षित राणाच्या शानदार गोलंदाजीने केकेआरने पंजाबला १५.३ षटकांत १११ धावांवर गुंडाळले. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु केकेआरच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली ज्यामुळे पंजाब संघ पूर्ण २० षटके खेळू शकला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com