Jasprit Bumrah IPL 2025 Saam Tv
Sports

Jasprit Bumrah : बुमराह आयपीएल खेळणार की नाही? आयपीएल सुरु होण्याआधीच दुखापतीची मोठी अपडेट समोर

Jasprit Bumrah IPL 2025 : जसप्रीत बुमराहच्या पाठीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापत झाली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये खेळता आले नव्हते. आता बुमराह आयपीएलला मुकणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Yash Shirke

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीझनला लवकरच सुरुवात होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर सर्व क्रिकेट चाहत्यांना आयपीएलचे वेध लागले आहेत. अशातच मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी काहीसा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. मुंबईचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच मैदानात उतरणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

ESPNCricinfo च्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यास बुमराह एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील होण्याची अपेक्षा आहे. बुमराह किती सामने खेळेल आणि तो मैदानावर कधी परतेल याची निश्चित तारीख ठरली नसल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सहभागी झाला नव्हता. तो आयपीएल २०२५ खेळेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुंबई इंडियन्सने १८ कोटी रुपये देऊन बुमराहला रिटेन केले होते.

मुंबई इंडियन्ससाठी जसप्रीत बुमराह महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. बुमराह व्यतिरिक्त मुंबईच्या संघामध्ये ट्रेंट बोल्ड, दीपक चहर असे वेगवान गोलंदाज देखील आहेत. याशिवाय मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या देखील वेगवान गोलंदाजी करतो. त्यामुळे बुमराह नसतानाही मुंबईच्या संघाला फारसा त्रास होणार नाही असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : रस्त्याची दयनीय अवस्था, गावकऱ्यांना संताप अनावर, अजित पवारांना काळे झेंडे दाखवण्याचा दिला इशारा

Jalgaon : मध्यरात्री काळाचा घाला, दुचाकीवर जाणाऱ्या ४ मित्रांचा मृत्यू, जळगावमध्ये भीषण अपघात

Aditi Tatkare: ५२ लाख महिला अपात्र नाहीत, मंत्री आदिती तटकरेंचं लाडक्या बहि‍णींना आवाहन

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT