SRH vs RR, CSK vs MI Pitch Report X (Twitter)
Sports

IPL 2025 : हैदराबाद आणि चेन्नईमध्ये कशी असेल खेळपट्टी? कोणत्या संघाला मिळणार फायदा? Pitch Report जाणून घ्या..

SRH vs RR, CSK vs MI Pitch Report : हैदराबाद आणि चेन्नई या दोन ठिकाणी आज अनुक्रमे हैदराबाद विरुद्ध राजस्थान आणि चेन्नई विरुद्ध मुंबई हे सामने आज खेळले जाणार आहेत. या दोन्ही स्टेडियमची पिच कशी असणार आहे? चला जाणून घेऊयात..

Yash Shirke

IPL 2025 : आयपीएलला काल सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात बंगळुरूच्या संघाने कोलकातावर विजय मिळवला. आज (२३ मार्च) रोजी आयपीएल २०२५ मधील पहिले डबल हेडर सामने खेळले जाणार आहेत. आज पहिला सामना हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात हैदराबाद येथे, तर दुसरा सामना मुंबई आणि चेन्नई यांच्यात चेन्नई येथे होईल.

आजचे दोन्ही हायवॉल्टेज सामने चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहेत. हैदराबाद आणि चेन्नई या दोन्ही ठिकाणची पिच रिपोर्ट समोर आली आहे. चेन्नईमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा बरेचदा विजय झाला आहे. तर हैदराबादमधील पिचचा फायदा रन चेज करणाऱ्या संघांना झाला आहे. हैदराबाद वेगवान गोलंदाजांसाठी आणि चेन्नई फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे.

हैदराबाद पिच रिपोर्ट

हैदराबादच्या राजीव गांधी आंतराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयपीएलचे एकूण ७७ सामने खेळले गेले आहेत. त्यात ३४ सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. तर ४२ सामन्यात रन चेजमुळे यश मिळाले आहेत. पहिल्या इनिंगमध्ये सरासरी धावसंख्या १६३ इतकी आहे. या स्टेडियमध्ये वेगवान गोलंदाजांचा दबदबा राहिला आहे. ७०.५८ टक्के विकेट्स वेगवाग गोलंदाजांनी काढल्या आहेत.

चेन्नई पिच रिपोर्ट

एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयपीएलचे एकूण ८५ सामने खेळले गेल आहेत. त्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्यांनी ४७ सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघांनी ३६ सामने जिंकले आहेत. या स्टेडियममध्ये पेसर्सनी ६१.५७ टक्के आणि स्पिनर्सनी ३८.४३ टक्के विकेट्स घेतल्या आहे. तरीही चेपॉक फिरकीपटूंसाठी फायदेशीर आहे असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT