glenn maxwell X (Twitter)
Sports

GT Vs PBKS Live Match : ग्लेन मॅक्सवेल आउट नव्हताच... श्रेयस अय्यरची एक चूक आणि मैदान सोडावं लागलं, नेमकं काय घडलं?

IPL 2025 Live Match Update : गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल शून्यावर बाद झाला. त्याच्या विकेटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Yash Shirke

Glenn Maxwell : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फलंदाजी करण्यासाठी पंजाबचे सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये उतरले.

सलामीवर प्रियांश आर्यने दमदार फटकेबाजी करायला सुरुवात केली. तर प्रभसिमरन सिंह स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर-अझमतुल्ला उमरझाई खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. दहाव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर उमरजाई कॅचआउट झाला आणि मॅक्सवेल फलंदाजीसाठी आला. पहिल्याच बॉलवर ग्लेन मॅक्सवेल एलबीडब्लू आउट झाला.

नेमकं काय घडलं?

साई किशन दहाव्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर अझमतुल्ला उमरझाई बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या ग्लेन मॅक्सवेलसमोर साई किशनने बॉल टाकला. त्यावर साई किशोर आणि गुजरातच्या खेळाडूंनी अपील केले. अंपायरनी मॅक्सवेल बाद झाल्याचे घोषित केले.

अंपायर्सनी मॅक्सवेल आउट झाल्याचे सांगितल्यानंतर मॅक्सवेल आणि नॉन स्ट्राईकला असलेल्या कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यात चर्चा झाली. श्रेयसने तो बाद असल्याचे म्हणत रिव्ह्यू घेतला नाही. पुढे रिव्ह्यू समोर आला. त्यात मॅक्सवेल बाद नव्हता हे सिद्ध झाले. अय्यरने डीआरएस न घेतल्याने मॅक्सवेल भोपळा न फोडता शून्यावर बाद होऊन माघारी परतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT