kapil dev saam tv
Sports

IPL 2025 Rule: IPLमध्ये हा नियम नकोच..विराटनंतर आता कपिल देव यांचाही विरोध, म्हणाले..

Family Rule In IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने नवीन नियम लागू केला होता. या नियमाला आता कपिल देव यांनीही विरोध केला आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाला गेल्या काही महिन्यांमध्ये २ महत्वाच्या कसोटी मालिका गमवाव्या लागल्या होत्या. न्यूझीलंडने भारतात येऊन भारतीय संघाला पराभूत केलं, त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सुमार कामगिरीनंतर बीसीसीआयने काही नवे नियम लागू केले होते.

त्यापैकीच एक नियम म्हणजे, खेळाडू दौऱ्यावर असताना कुटुंबाला सोबत न ठेवण्याचा नियम. या नियमानुसार, खेळाडूंना कुटुंबातील सदस्यांना दौऱ्यावर घेऊन जाण्यासाठी बंदी घातली गेली आहे. या नियमाला विराट कोहलीने विरोध केला होता. त्यानंतर मोहीत शर्मादेखील विरोध करताना दिसून आला होता. आता या नियमाला विरोध करण्यासाठी कपिल देव यांनीही एन्ट्री केली आहे.

आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी लागू करण्यात आलेल्या नियमानुसार, सामन्यावेळी किंवा सरावावेळी कुटुंबातील सदस्यांना ड्रेसिंग रुममध्ये येण्याची अनुमती दिली जाणार नाही. त्यांना जर सामना पाहायचा असेल, तर ते हॉस्पॅलिटी बॉक्समध्ये बसून सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

बीसीसीआयच्या या नियमाला विराट कोहलीने विरोध केला होता. त्याने म्हटले होते की, एखादा खेळाडू जेव्हा आऊट ऑफ फॉर्म असतो, तेव्हा कुटुंबातील सदस्य त्याची नाराजी दूर करण्यात मोलाची भूमिका बजावतात. कुठल्याच खेळाडूला असं वाटत नाही, की त्याने या कठीण काळात एकटं राहावं. विराटने विरोध केल्यानंतर आता त्याला कपिल देव यांचाही पाठींबा मिळाला आहे.

विराटच्या विरोधाला कपिल देव यांचा पाठींबा

एका गोल्फ स्पर्धेच्या ओपनिंगच्या वेळी कपिल देव यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ' हा नियम बनवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. माझं म्हणणं इतकंच आहे की, खेळाडूंना कुटुंबातील सदस्यांची गरज असते. मात्र संघाची साथ असणंही तितकंच गरजेचं आहे. आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा असं म्हणायचो की, पहिल्या हाल्फमध्ये आम्हाला क्रिकेट खेळू द्या.. पण दुसऱ्या हाल्फमध्ये कुटुंबातील सदस्यांनाही इथे येऊन आनंद घेऊ द्या. हे मिश्रण दिसून यायला हवं.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT