ipl trophy saam tv news
Sports

IPL 2025: आयपीएल स्पर्धेची तारीख ठरली! केव्हा, कधी अन् कुठे होणार स्पर्धा? जाणून घ्या

IPL 2025 Date And Schedule: आयपीएल २०२५ स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ही स्पर्धा केव्हा सुरु होणार? आणि कुठे खेळवली जाणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएल २०२५ स्पर्धा केव्हा सुरू होणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएलचा आगामी हंगाम येत्या २१ मार्चपासून सुरू होणार आहे.

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. नुकताच बीसीसीआयची वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत हा चर्चा करण्यात आली आहे. राजीव शुक्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आयपीएलचे पुढील हंगाम २३ मार्चपासून सुरू होणार आहे. तर एका वरिष्ठ सदस्याने सांगितले की, ही स्पर्धा २० किंवा २१ मार्चला सुरू होऊ शकते.

तर, ईएसपीएनक्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार, ही स्पर्धा २१ मार्चला सुरू होऊ शकते, तर २५ मे रोजी स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाईल. ही क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी झाल्यानंतर लगेच या स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. यापूर्वी आयपीएल २०२४ स्पर्धेचा थरार, २२ मार्चला सुरू झाला होता.

तर स्पर्धेतील अंतिम सामना २६ मे रोजी खेळवला गेला होता. या स्पर्धेतील पहिला सामना चेपॉकच्या मैदानावर रंगला होता. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

बीसीसीआयच्या नवनियुक्त समितीची बैठक पार पडली. जय शहानंतर देवजित सौकिया यांची बीसीसीआयच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे. या बैठकीत काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आयपीएलसह वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेबाबतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेची तारीख आणि ठिकाण जवळजवळ निश्चित झालं आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेतील सलामीचा सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार असल्याचं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT