MS Dhoni CSK X
Sports

MS Dhoni : दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी CSK मध्ये मोठा उलटफेर; धोनीकडं कर्णधारपद जाण्याची शक्यता, कारण...

MS Dhoni CSK : चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हा सामना उद्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यामध्ये चेन्नई संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीकडे दिले जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Yash Shirke

MS Dhoni CSK Captain : चेपॉकमध्ये उद्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यामध्ये एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्त्व करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली होती. त्यामुळे धोनीकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाईल असे म्हटले जात आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजी विभागाचे प्रशिक्षक मायकल हसी यांनी यासंबंधित माहिती दिली. 'शुक्रवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर सराव सत्रादरम्यान गायकवाडच्या दुखापतीचे मूल्यांकन केले जाईल. उद्या सामन्यापूर्वी त्याच्या दुखापतीचे पुन्हा एकदा मूल्यांकन केले जाईल आणि त्यानंतर कर्णधारपदाचा निर्णय घेतला जाईल', असे मायकल हसी यांनी म्हटले आहे. नव्या कर्णधाराबद्दल प्रश्न विचारल्यावर हसी यांनी 'स्टंपमागून एक तरुण (धोनी) दिल्ली विरुद्धच्या सामन्यात सीएसकेचे नेतृत्त्व करेल', असे गमतीने म्हटले.

३० मार्च रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स विरुद्ध फलंदाजी करत असताना ऋतुराज गायकवाडच्या कोपराला दुखापत झाली होती. त्यामुळे एमएस धोनीकडे कर्णधारपद दिले जाईल असे संकेत मायकल हसी यांनी दिले आहेत. 'मला वाटत नाही की, आम्ही त्याविषयी (कर्णधारपदाविषयी) जास्त विचार केला आहे. स्टीफन फ्लेमिंग आणि ऋतुराज गायकवाड यांची या गोष्टीवर चर्चा केली असेल', असे मायकल हसी यांनी म्हटले.

महेंद्रसिंह धोनीने २००८ पासून चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्त्व केले होते. त्याच्या कारकीर्दीमध्ये सीएसकेने तब्बल पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते. मागच्या वर्षी चेन्नईच्या संघाद्वारे ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. तेव्हापासून ऋतुराज आयपीएलमध्ये सीएसकेचे नेतृत्त्व करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

SCROLL FOR NEXT