RCB vs PBKS 
क्रीडा

RCB vs PBKS: RCBने उघडलं विजयाचं खातं; २८० च्या स्ट्राइक रेटने 'संकटमोचक' कार्तिकची 'कातील' फलंदाजी

RCB vs PBKS: पंजाब आणि आरसीबीमध्ये झालेल्या सामन्याने परत एकदा क्रिकेट प्रेमीची धकधक वाढवली.

Bharat Jadhav

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings :

एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर दिनेश कार्तिकने अवघ्या मिनिटाच्या धमाकेदार फलंदाजीने पंजाबला मात दिली. २८० स्ट्राइक रेटने फलंदाजी करत दिनेश १० चेंडूमध्ये २८ धावा ठोकत आरसीबीच्या विजयाचं खातं उघडून दिलं. आपल्या घरच्या मैदानात खेळताना आरसीबीने ४ विकेट राखत पंजाबला मात दिलीय.(Latest News)

पंजाब आणि आरसीबीमध्ये झालेल्या सामन्याने परत एकदा क्रिकेट प्रेमीची धकधक वाढवली. आरसीबी हा सामना एक हाती जिंकेल अस वाटत असताना चाहत्यांना अखेरच्या षटकापर्यंत आपला श्वास रोखून धरावा लागला. पुन्हा एकदा दिनेश कार्तिकने संकटमोचकच काम केलं आहे. विराटच्या विकेट नंतर आरसीबी दुसरा सामनाही गमावणार असं वाटत असताना दिनेशने संघाच्या विजयाची आशा पल्लवित केली.

जेव्हा संघाला विजयासाठी २४ चेंडूत ४७ धावांची गरज होती. पण त्यानंतर दिनेश कार्तिक आणि महिलपाल लोमरोर यांनी नाबाद ४८ धावांची भागीदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला. कार्तिक आणि लोमरोर यांच्या फलंदाजीने पंजाबच्या हातातील विजय हिसकावून घेतला. कोहलीने ११ चौकार आणि २ षटकार लगावत ७७ धावा केल्या होत्या.

आयपीएल २०२४ च्या सहाव्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्सचा ४ गडी राखून पराभव केला. एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा सामना खूपच रंजक होता. एकतर्फी वाटणारा हा सामना प्रत्येक क्षणी आपली दिशा बदलत होता. कधी आरसीबीचा विजय होईल असं वाटत होतं तर कधी पंजाब किंग्स हा जिंकतील असं वाटत होतं. पण शेवटी आरसीबीने विजय मिळवला. संघासाठी, दिनेश कार्तिकने १० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद २८* धावा केल्या. लोमररने त्याला साथ दिली त्याने ८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने १७ धावा केल्या. लोमरॉरने प्रभावशाली खेळाडू म्हणून प्रवेश केला आणि वेगळा प्रभाव टाकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuljabhavani Mandir : तुळजाभवानी मंदिराला पावणेतीन कोटींचे उत्पन्न; भाविकांमार्फत ६५३ ग्रॅम सोने व १३ किलो चांदी अर्पण

Peanut And Jaggery: थंडीमध्ये शेंगदाणे-गुळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

Tongue Taste Change: 'या' आजारांमुळे अचानक बदलते जीभेची चव; दुर्लक्ष करणं तुम्हाला पडेल महागात

Porsche Accident : पोर्शे अपघाताला ६ महिने पुर्ण; रस्त्यावर उतरत तरुणाईची मेणबत्ती पेटवून आदरांजली

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोरगी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

SCROLL FOR NEXT