Rohit sharma google
क्रीडा

Rohit Sharma In CSK: रोहित शर्मा धोनीच्या CSK कडून खेळणार?, पत्नी रितिकाची सोशल मिडिया पोस्ट व्हायरल

Ankush Dhavre

Rohit Sharma Chennai Super Kings:

मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. आतापर्यंत या संघाने पाच वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. मात्र सुरुवातीच्या २००८ ते २०१२ हंगामात मुंबईला एकाही हंगामात जेतेपदाला गवसणी घातला आली नव्हती.

रोहितला २०१३ मध्ये कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली आणि पहिल्याच हंगामात त्याने मुंबईला चॅम्पियन बनवलं. दरम्यान १० वर्षांनंतर मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ही जबाबदारी हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान रोहितची पत्नी रितिकाने केलेल्या एका कमेंटमुळे आता वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत.

रोहितला कर्णधारपदावरुन काढला याचा मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावरुन मुंबईचे १ मिलियनहून अधिक फॉलोवर्स कमी झाले आहेत. तर काही क्रिकेट चाहत्यांनी मुंबईची जर्सी आणि कॅप जाळली आहे. तर काहींचं असं म्हणणं आहे की, रोहितने मुंबई इंडियन्सला टाटा बायबाय करावं आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळावं.

रितिकाची कमेंट चर्चेत..

रोहितला (Rohit Sharma) कर्णधारपदावरुन काढल्यानंतर आयपीएल स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्ज संघाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी रोहितच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी रोहितच्या कारकिर्दीतील महत्वपुर्ण क्षणांची पुनरावृत्ती केली आहे.

या पोस्टवर रितिकाने (Ritika Sajdeh Comment) कमेंट केली आहे. तिने या पोस्टवर पिवळ्या रंगाचा हार्ट शेअर केला आहे. यावरुन रोहित आता मुंबईची साथ सोडून चेन्नईत जाणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. (Latest sports updates)

हार्दिक करणार मुंबईचं नेतृत्व..

आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. गेल्या २ हंगामात हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्स संघाचं नेतृत्व केलं. त्यानंतर आगामी हंगामसाठी मुंबईने ट्रे़ड करत संघात स्थान दिलं आहे. दरम्यान माध्यमातील वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की,मुंबईत येण्यापूर्वी हार्दिकने कर्णधारपदाची अट ठेवली होती. ही अट रोहितने आणि मुंबई इंडियन्सने मान्य केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंगळ ग्रहाला का म्हटलं जातं रेड प्लॅनेट?

Assembly Election: विधानसभेच्या मैदानात 'तुतारी'चाच आवाज! उमेदवारीसाठी तब्बल १६०० अर्ज; शरद पवारांकडून मुलाखतींचा धडाका

Baby Names Inspired by Flowers : सुगंधी आणि नाजूक फुलांवरून मुलींच्या नावाची यादी

Uddhav Thackeray: तुमच्या डोळ्यावरचं झापड पुसलं गेलं, शिंदे गटातून कार्यकर्ते परतले; ठाकरे काय म्हणाले?

Accident : कार- टेम्पोचा भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT