ज्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये पाच वेळा विजय मिळवू शकली, त्या रोहित शर्माचं कर्णधारपद आता हार्दिक पंड्याला देण्यात आलंय. 2022 साली हार्दिक पंड्या मुंबईचा संघ सोडून गुजरात टायटन्स संघात गेला होता. याच वर्षी गुजरातने आयपीएलमध्ये विजयही मिळवला होता. पण 2023च्या डिसेंबर महिन्यात हार्दिकचं मुंबई इंडियन्स संघात पुनरागमन झालं आणि तो आता मुंबईचं नेतृत्त्व करेल, अशी कुजबूज सुरु झाली होती. अखेर ही कुजबूज आता खरी ठरल्यानं रोहित शर्माच्या चाहत्यांना धक्का बसलाय.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सने 2023. 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचा खिताब आपल्या नावे केला होता. रोहितच्या नेतृत्त्वात आतापर्यंत मुंबई इंडियन्स 158 सामने खेळली आहे. ज्यात 84 सामन्यांत मुंबईचा विजय झालाय. तर 67 सामन्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय. तर 4 सामने अनिर्णित राहिले होते.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने आता एक प्रेसनोट जारी करत कर्णधाराबाबतचा आपला निर्णय जाहीर केलाय. रोहित शर्माला कर्णधार पदावरुन हटवत आता हार्दिक पंड्या संघाचं नेतृत्त्व करेल, असं स्पष्ट करण्यात आलंय. मुंबई इंडियन्स संघाचे ग्लोबल हेड ऑफ परफॉरमन्स महेल जयवर्धने यांनी हा निर्णय भविष्याचा विचार करुन घेतला गेल्याचंही म्हटलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.