Ipl 2024 Rishabh Pant  
क्रीडा

IPL 2024: 4 6 6 4 4 4 ..भीषण अपघातातून बचावला, मैदानात उतरला अन् जिंकला; ऋषभ पंतनं KKR विरुद्ध पाडला धावांचा पाऊस

Bharat Jadhav

IPL 2024, Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Rishabh Pant Half Century :

विशाखापट्टणमच्या स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या १६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा दारूण पराभव झाला. कोलकता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजीची जबर धुलाई करत २७२ धावा केल्या. हे आव्हान पूर्ण करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. अवघ्या ३३ धावांमध्ये दिल्लीच्या संघाने ४ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर मैदानावर आलेल्या ऋषभ पंतने धमाकेदार फंलदाजी करत २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. (Latest News)

मात्र पंत बाद झाल्यानंतर संघातील इतर खेळाडूंना धमाकेदार खेळी करता आली नाही. परिणामी दिल्लीचा खेळ १६६ धावांवर आटोपला. या सामन्यात पंतची फलंदाजी सर्वांना भावली. अपघातानंतर मैदानात उतरलेल्या पंतने केलेली ही सर्वात जबरदस्त खेळी होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केकेआरची फटकेबाजी

केकेआरच्या संघाने आक्रमक सुरुवात करत १० षटकात १२५ धावांचा पल्ला गाठला होता. केकेआरचे सलामीवीर आणि मधल्या फळीतील खेळाडूंनी फटकेबाज करत धावांचा डोंगर उभारला होता. सुनिल नारायण आणि रघुवंशी यांच्या भागीदारीने दिल्लीची धकधक वाढवली. सुनिल नारायणने ३९ चेंडूमध्ये ८५ धावा केल्या.

यात ७ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. सुनिल नारायणने या धावा २१५ च्या स्ट्राइक रेटने केल्या. तर रघुवंशीने २७ चेंडूंमध्ये ५४ धावा केल्या. त्यानंतर आंद्रे रसेलने १९ चेंडूमध्ये ४१ धावांची धमाकेदार फलंदाजी केली. या सर्वांच्या फटकेबाजीमुळे केकेआरने २७२ धावा करत दिल्लीसमोर २७३ धावांचे आव्हान दिले.

पर्वताएवढं आव्हान पाहून अनेकांची भंबेरी उडाली होती. हे आव्हान पार करणं अशक्यच काम होतं. आव्हानाची धावसंख्या वाढत असताना दिल्लीचा कर्णधार पंतच्या चेहऱ्यावरल चिंता वाढू लागली होती. सामना जिंकण्यासाठी योग्य रणनिती करणं आवश्यक होतं. प्रत्येक धाव प्रत ऋषभ नव-नवीन रणनिती डोक्यात ठरत होता. त्याप्रमाणे त्याने आपल्या संघाला मैदानात उतवरवला.

केकेआरने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. सुरुवातीचे ४ गडी स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर पंत मैदानात उतरला. कर्णधार म्हणून संघाला जिंकवणं त्यांचं कर्तव्य होतं. हे कर्तव्य त्याने त्याच्या खेळीतून पार पाडलं. केकेआरचं आव्हान पाहून अनेकांनी मैदानात उतरण्यापूर्वीचं हार पत्कारली असती. परंतु पंतने आत्मविश्वास दुप्पटीने वाढवत आणि आपल्या खेळीवर विश्वास ठेवत केकेआरच्या गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली.

२३ चेंडूत अर्धशतक केलं पूर्ण

सुरुवातीचे विकेट हातातून गेले असताना मैदानावर टिकून राहणं आणि सतत धावा करणं ही मोठी जबाबदारी कर्णधार म्हणून पंतला पार पाडायची होती. या दोन्ही गोष्टी पंतने व्यवस्थित पार पाडल्या. ऋषभ पंतने २३ चेंडूंत सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केलं. व्यंकटेश अय्यरच्या एका षटकात त्याने २८ धावा काढत पंतने पूर्वीचं रुद्र रुप दाखवलं. यंदाच्या पर्वातील अय्यरचं हे महागडे षटक ठरले. अय्यरनंतर पुढचं षटक वरुण चक्रवर्थीने टाकलं त्याने ऋषभला ५५ धावांवर बाद केल्याने दिल्लीच्या विजयाच्या अपेक्षा भंग मंदावल्या.

पंतचं दमदार कमबॅक

२०२२ मध्ये ऋषभ पंतच्या कारचा अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. या दुर्घटनेनंतर पंत परत मैदानात उतरेल का नाही? याविषयी अनेकांना शंका होती. अपघातात झालेल्या दुखपातीतून दुरुस्त होण्यासाठी त्याला खूप काळ लागला. ऋषभ पंत तंदुरुस्त होऊन परत मैदानावर फटकेबाजी करताना दिसेल का? आधीप्रमाणेच तो गोलंदाजाना घाम फोडेल का असा प्रश्न विचारला चाहत्याना पडला होता. मात्र केकेआरविरुद्ध झालेल्या सामन्यात पंतने केलेली फलंदाजी ही सर्वात खतरनाक फलंदाजी होती. पंतने २२२ च्या स्ट्राइक रेटने २५ चेंडूत ५५ धावा केल्या. यात ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT