आयपीएल २०२४ चा सहावा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होत आहे. पंजाब किंग्सने बेंगळुरूसमोर १७७ धावांचं आव्हान ठेवलंय. यावेळी कर्णधार शिखर धवनने सर्वाधिक धावांची खेळी केली. शिखरने ४५ धावा करत बेंगळुरूसमोर १७७ धावांचं आव्हान ठेवलं.
दरम्यान बेंगळुरू येथील एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होत आहे. चिन्नास्वामी स्टेडियम हे छोटे क्रिकेट स्टेडियम असून येथे विजय मिळवण्यासाठी मोठी धावसंख्या उभारणं आवश्यक असते. परंतु पंजाबच्या फलंदाजांनी लवकर विकेट दिल्याने शिखर धवनच्या संघाला मोठं आव्हान उभारता आले नाही. (Latest News)
आरसीबीकडून मोहम्मद सिराजने २ विकेट घेतल्या. यंदाच्या आयपीएल हंगामात पहिला विजय नोंदवण्यासाठी आरसीबीला १७७ धावांचे आव्हान मिळाले आहे. बेंगळुरुच्या मैदानावर शिखर धवन आणि जॉनी बेयरस्टोने पंजाबच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पंजाबच्या डावाला आक्रमक सुरुवात केली. पण मोहम्मद सिराजने बेयरस्टोला बाद केले.
बेयरस्टो या डावात फक्त ८ धावा करता आल्या. बेयरस्टो बाद झाल्यानंतर शिखर धवन यानं प्रभसिमरन याच्यासोबत डावाला आकार देत एक सन्मानजनक धावासंख्या उभारली. प्रभसिमरन २५ धावा केल्या. प्रभसिमरनने २ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने १७ चेंडूमध्ये २५ धावा जोडल्या.
शिखर धवन आणि प्रभसिमरन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूमध्ये ५५ धावांची भागिदारी केली. शिखर धवनने त्यानंतर लिव्हिंगस्टोनसोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. पण लिव्हिंगस्टोनही बाद झाला. लिव्हिंगस्टोनला १७ धावांवर अल्जारी जोसेफ याने बाद केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.