IPL 2024 punjab kings breaks the record of cricket australia and team india  yandex
Sports

GT vs PBKS: पंजाबने रचला इतिहास! गुजरातला हरवताच मोडला टीम इंडिया अन् ऑस्ट्रेलियाचा महारेकॉर्ड

Punjab Kings Record News: या सामन्यात पंजाब किंग्स संघाने विजय मिळवताच टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

Punjab Kings Record News:

गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर पंजाब किंग्ज संघाने ३ गडी राखून शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला विजयासाठी २०० धावांचं आव्हान होतं. या धावांचा पाठलाग करताना शशांक सिंग आणि आशुतोष शर्माच्या शानदार खेळीच्या पंजाबने हरलेला सामना जिंकला. यासह पंजाब किंग्ज संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

पंजाब किंग्जने रचला इतिहास..

गुजरातने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाकडून शशांक सिंगने आणि आशुतोष शर्माने महत्वपूर्ण भागीदारी केली आणि पराभूत होत असलेल्या पंजाब किंग्ज संघाला विजयाची चव चाखून दिली. यासह पंजाब किंग्जचा संघ टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ६ वेळेस २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारा पहिलाच संघ ठरला आहे.

हा रेकॉर्ड करत पंजाब किंग्ज संघाने भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना मागे सोडलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाने टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक ५-५ वेळेस २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. यासह मुंबई इंडियन्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाने देखील टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ५-५ वेळेस २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. (Cricket news in marathi)

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणारे संघ...

पंजाब किंग्ज - ६ वेळेस

क्वेटा ग्लॅडिएटर्स- ५ वेळेस

मुंबई इंडियन्स- ५ वेळेस

भारतीय संघ- ५ वेळेस

ऑस्ट्रेलिया संघ - ५ वेळेस

पंजाबचा शानदार विजय

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स संघाने २० षटकअखेर १९९ धावा केल्या. गुजरातकडून कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली. पंजाबला हा सामना जिंकण्यासाठी २०० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना शशांक सिंगने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. शेवटी आशुतोष शर्माने आक्रमक खेळी करत २१ धावा चोपल्या आणि संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT