IPL 2024 Points table update after kolkata knight riders vs delhi capitals match amd2000 twitter
क्रीडा

IPL 2024 Points Table: राजस्थाननंतर KKR ची प्लेऑफच्या दिशेने वाटचाल! दिल्लीचं टेन्शन वाढलं; पाहा गुणतालिका

IPL 2024 Latest Points Table Update: आयपीएल २०२४ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाची शानदार कामगिरी सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७ गडी राखून विजय मिळवला

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाची शानदार कामगिरी सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७ गडी राखून विजय मिळवला. या शानदार विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. मात्र या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स संघासाठी करो या मरोची स्थिती असणार आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेच्या गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणारा राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाला गेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र हा सामना जिंकून या संघाने १२ गुणांची कमाई करत दुसरं स्थान मिळवलं आहे. या संघाने आतापर्यंत एकूण ९ सामने खेळले आहेत. यादरम्यान या संघाला केवळ ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर ६ सामने जिंकले आहेत.

दिल्लीला मोठा धक्का...

कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाचं टेन्शन वाढलं आहे. कारण हा संघ टॉप ५ मधून बाहेर झाला आहे. या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ गुणतालिकेत टॉप ५ मध्ये होता. मात्र आता हा संघ सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तर लखनऊचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा पुढील सामना ७ मे रोजी राजस्थान रॉयल्स संघासोबत होणार आहे. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला राजस्थान रॉयल्सला हरवणं दिल्ली कॅपिटल्स संघासाठी मुळीच सोपं नसणार आहे.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात रिषभ पंतने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय दिल्लीच्या फलंदाजांना सार्थ ठरवता आला नाही. कारण कुठल्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

कुलदील यादवने सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर ९ गडी बाद १५३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २१ चेंडू आणि ७ गडी राखून हा सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT