T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी आज BCCI ची बैठक! या १५ खेळाडूंना मिळू शकते संधी

BCCI Team Seletion For T20 World Cup 2024: आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी आज बीसीसीआयची महत्वाची बैठक पार पडणार आहे.
टी-२० वर्ल्डकपसाठी आज BCCI ची बैठक! या १५ खेळाडूंना मिळू शकते संधी
team india squad for t20 world cup 2024 is likely to announced on 30th april these 15 players will get chancetwitter
Published On

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे भारतीय संघात कोणत्या १५ खेळाडूंना स्थान मिळणार याची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत. माध्यमातील वृत्तानुसार आज भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. कारण या स्पर्धेसाठी संघाची घोषणा करण्याची शेवटची तारीख १ मे आहे. सोमवारी (२९ एप्रिल) न्यूझीलंडने आपल्या संघाची घोषणा केली आहे.

माध्यमातील वृत्तानुसार बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत ही बैठक अहमदाबादेत पार पडणार आहे. या बैठकीत भारतीय संघाची निवड केली जाणार आहे.

यापूर्वी २७ एप्रिल रोजी अजित आगरकर दिल्लीला गेले होते. इथे त्यांनी राहुल द्रविड आणि रोहित शर्माची भेट घेतली. आता दुसऱ्यांदा होणाऱ्या बैठकीत भारतीय संघाची अधिकृत घोषणा केली जाईल. टी -२० वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा करण्याची शेवटची तारीख १ मे आहे.

टी-२० वर्ल्डकपसाठी आज BCCI ची बैठक! या १५ खेळाडूंना मिळू शकते संधी
KKR vs DC, IPL 2024: आज कोलकाता -दिल्ली आमने सामने ! कोणाचं पारडं राहिलंय जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा वेस्टइंडीज आणि अमेरिकेत पार पडणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून रोजी आयर्लंड संघाविरुद्ध रंगणार आहे. तर बहुप्रतिक्षित भारत - पाकिस्तान सामना येत्या ९ जून रोजी रंगणार आहे.

टी-२० वर्ल्डकपसाठी आज BCCI ची बैठक! या १५ खेळाडूंना मिळू शकते संधी
MS Dhoni Record: एमएस धोनीने रचला इतिहास! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला जगातील पहिलाच खेळाडू

टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी असा असू शकतो भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टिरक्षक), रिंकू सिंग, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com