IPL 2024 PBVKS vs KKR Match Saam TV
क्रीडा

IPL 2024 Points Table: पंजाबच्या विजयाचा मुंबई इंडियन्सला मोठा फटका; हार्दिकचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचणार का?

IPL 2024 PBKS vs KKR Match: पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे.

Satish Daud

IPL 2024 Points Table:

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत पंजाबने कोलकाता नाईट रायडर्सवर ऐतिहासिक विजय मिळवला. कोलकाताने उभा केलेला २६१ धावांचा डोंगर पंजाबने केवळ १८.४ षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात सर केला. या ऐतिहासिक विजयाने आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे.

पंजाबच्या विजयाने गुणतालिकेत हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केल्यानं पॉइंट टेबलमध्ये चुरस वाढली आहे. कारण अजूनही पंजाब किंग्सच्याही प्लेऑफमध्ये पोहचण्याचा आशा जिवंत आहेत.

पंजाब किंग्सने कोलकाताविरुद्धचा सामना जिंकताच ६ गुणांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे उर्वरित ५ सामन्याचं गणित पाहता पंजाबला टॉप ४ मध्ये स्थान मिळवणं कठीण नाही. पंजाब किंग्सचे अजूनही ५ सामने बाकी असून त्यांना १० गुण मिळवण्याची संधी आहे.

उर्वरित सर्व सामने जिंकल्यास पंजाबचा संघ टॉप ४ मध्ये स्थान मिळवेल. दुसरीकडे पंजाबच्या विजयाने मुंबई इंडियन्सचं मोठं नुकसान झालं आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. मुंबईचे ८ सामन्यात फक्त ६ गुण आहेत.

अजूनही त्यांचे ६ सामने बाकी असून या सर्वच सामन्यात त्यांना विजय मिळवावा लागणार आहे. ६ पैकी एकही सामना गमावल्यास मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित खूपच किचकट होईल. गुणतालिकेत कोलकात्याचा संघ दुसऱ्याच स्थानावर आहे. पण त्याच्या नेट रनरेटवर मोठा परिणाम झाला आहे.

आयपीएल २०२४ पॉइंट टेबल

  • राजस्थान रॉयल्सच्या संघाने ८ पैकी ७ सामने जिंकले असून त्यांच्या खात्यात १४ गुण आहेत. ०.६९८ च्या नेट रनरेटसह ते पहिल्या स्थानी आहेत.

  • कोलकाता नाईट रायडर्सने ८ पैकी ४ सामने जिंकले असून १० गुणांसह आणि ०.९७२ नेट रनरेटसह ते दुसऱ्या स्थानावर आहेत.

  • सनरायझर्स हैदराबाद संघाने ८ पैकी ७ सामने जिंकले आहेत. त्यामुळे ते १० गुण आणि ०.६२७ नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

  • लखनौ सुपर जायंट्स संघाने ८ पैकी ५ सामन्यांत विजय मिळवला असून १० गुणांसह आणि ०.१४८ नेट रनरेटसह ते चौथ्या स्थानावर आहेत.

  • चेन्नई सुपर किंग्सने ८ पैकी ४ सामन्यात विजय मिळवलाय. ८ गुणांसह आणि ०.४१५ नेट रनरेटसह चेन्नईचा संघ पाचव्या स्थानावर आहे.

  • दिल्ली कॅपिटल्स ८ गुण आणि -०.३८६ नेट रनरेटसह सहाव्या, तर गुजरात टायटन्स ८ गुण आणि -०.९७४ नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे.

  • पंजाब किंग्स ६ गुण आणि -०.१८७ नेट रनरेटसह आठव्या, मुंबई इंडियन्स ८ गुण आणि -०.२२७ नेट रनरेटसह नवव्या क्रमांकावर आहे. आरसीबीचा संघ ४ गुणांसह दहाव्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१२ डिसेंबरपासून राजासारखं आयुष्य जगणार 'या' राशी; आर्थिक फायद्यासह चांगल्या संधीही मिळणार

Cotton Price : कापसाला मिळाला साडेसात हजाराच्यावर दर; पहिल्याच दिवशी २५०० क्विंटलची आवक

Kashmera Shah Accident: कृष्णा अभिषेकच्या पत्नीचा परदेशात झाला भीषण अपघात, फोटो शेअर करत म्हणाली, जखमांचे व्रण...

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

SCROLL FOR NEXT