Virat Kohli: स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीवर महान क्रिकेटपटूचा 'स्ट्राइक'

Virat Kohli IPl 2024: सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या या आयपीएल सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सामन्यात विराट कोहलीने ४३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली.
Virat Kohli: स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीवर महान क्रिकेटपटूचा 'स्ट्राइक'
Virat Kohli IPl 2024Saam Tv
Published On

IPl 2024 Virat kohli Strike Rate : विराट कोहलीने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यातील पावरप्ले दरम्यान १८ चेंडू ३२ धावा केल्या होत्या. विराट कोहलीने या दरम्यान ४ चौकार आणि १ षटकार लगावला. विराट कोहलीचा स्टाइक रेट हा १८० होता. त्यानंतर त्याने कासवगती धावा बनवणं सुरू केलं.

आयपीएल सामन्यात ऑइल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादचा ३५ धावांनी पराभव केला. पण स्टार फलंदाज विराट कोहलीच्या फलंदाजीची बरीच चर्चेत राहिली. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या या आयपीएल सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सामन्यात विराट कोहलीने ४३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. विराट कोहलीने या खेळीत १ षटकार आणि ४ चौकार लगावलेत.

काल झालेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोहलीने पॉवरप्लेमध्ये १८ चेंडूत ३२ धावा केल्या. कोहलीने या धावा करताना ४ चौकार आणि १ षटकार मारला होता. विराट कोहलीचा स्ट्राईक रेटही १८० होता, मात्र त्यानंतर रन मशीन नावाने ओळखला जाणारा किंग कोहलीने कासवगतीने फलंदाजी केली.

विराट कोहलीला त्याच्या डावातील पुढील २५ चेंडूंमध्ये एकही चौकार मारता आला नाही. पॉवरप्ले दरम्यान कोहलीने ७५ च्या आसपास स्ट्राइक रेटने फलंदाजीला सुरुवात केली. विराट कोहलीच्या स्ट्राईक रेटमध्ये अचानक, अशी घसरण पाहून चाहत्यांसह दिग्गज क्रिकेट्सर्ससुद्धा आश्चर्यचकित झालेत.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी रजत पाटीदारने २० चेंडूत ५० धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने ५ षटकार आणि २ चौकार मारले. रजत पाटीदारचा स्ट्राईक रेटही या काळात २५० राहिला. तर विराट कोहलीची फलंदाजी रजत पाटीदारपेक्षा खूपच संथ होती. काही दिवसांनी टी-२०वर्ल्डचे सामने होणार आहेत. त्याच दरम्यान कोहलीची संथ गतीचे खेळी टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. कोहलीच्या कासवगती खेळीवरून भारतीय दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी खडेबोल सुनावले आहेत.

सामन्यादरम्यान समालोचन करताना सुनील गावस्कर म्हणाले, 'फक्त एक, एक आणि एक धावा करत आहात. कोहलीनंतर दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर हे खेळण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे रिस्क घ्यावी लागेल. पाटीदारने एकाच षटकात ३ षटकार मारलेत. त्याला हवे असते तर तो सिंगल घेऊ शकला असता. किंवा वाईड जाणारा चेंडूसुद्धा त्याने तसे केले नाही. जिथे जिथे संधी मिळाली त्याचा फायदा घेतला. त्यानंतर गावस्कर म्हणाले की, ‘आरसीबीला याची गरज आहे. कोहली खेळला पण संधी गमावली. कोहलीला आता त्याच्या शेलमधून बाहेर यावे लागेल. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. असं गावस्कर म्हणालेत.

१ जून ते २९ जून दरम्यान टी- २० विश्वचषक खेळवला जाणार आहे. टीम इंडिया ५ जूनपासून आयर्लंडविरुद्ध टी २० विश्वचषक २०२४ मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. आयसीसीने संघ निवडण्यासाठी १ मे ही मुदत दिलीय. बीसीसीआय या आठवड्याच्या शेवटी किंवा पुढील आठवड्याच्या सुरुवातीला संघाची घोषणा करू शकते.

Virat Kohli: स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीवर महान क्रिकेटपटूचा 'स्ट्राइक'
RCB Won Against SR: होम ग्राउंडवर हैदराबादचं सपशेल लोटांगण; बेंगळुरूला तब्बल १ महिन्यानंतर विजयाचा सूर गवसला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com