IPL 2024 Points table latest update after mi vs dc and lsg vs gt match know latest ipl standing twitter
क्रीडा

IPL 2024, Points Table: पहिलाच विजय अन् मुंबईची मोठी झेप! गुणतालिकेचं समीकरण बदललं

Points Table Update After LSG vs GT Match: आयपीएल २०२४ स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते.

Ankush Dhavre

Points Table Update After LSG vs GT Match:

आयपीएल २०२४ स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. तर दुसऱ्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये लढत रंगली. पहिला सामना मुंबईने जिंकला. तर दुसऱ्या सामन्यात लखनऊने बाजी मारली. दरम्यान या दोन्ही सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला आहे.

दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत मुंबई इंडियन्सने या हंगामातील पहिला विजय मिळवला आहे. या विजयासह सर्वात शेवटी असलेला मुंबई इंडियन्सचा सं गुणतालिकेत ८ व्या स्थानी पोहोचला आहे . तर आतापर्यंत ९ व्या स्थानी असलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ १० व्या स्थानी पोहोचला आहे. तर डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात गुजरातला नमवत लखनऊ सुपर जायंट्स संघाने टॉप ३ मध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यापूर्वी लखनऊचा संघ चौथ्या स्थानी पोहोचला आहे. या सामन्यानंतर चेन्नईचा संघ चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

गुणतालिकेबद्दल बोलायचं झालं तर, राजस्थान रॉयल्स संघ सध्या अव्वल स्थानी आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. या चारही सामन्यांमध्ये राजस्थानने विजय संपादन केला आहे. ३ पैकी ३ सामने जिंकणारा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर ४ पैकी ३ सामने जिंकणारा लखनऊ सुपर जायंट्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. ४ पैकी २ सामने जिंकून ४ गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. (Cricket news in marathi)

तर उर्वरित संघांबद्दल बोलायचं झालं, तर ४ गुणांसह सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. ४ पैकी २ सामने जिंकून पंजाब किंग्जचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. तर ४ गुणांसह गुजरातचा संघ सातव्या, २ गुणांसह मुंबई इंडियन्सचा संघ आठव्या, २ गुणांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ नवव्या स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ २ गुणांसह सर्वात शेवटी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

SCROLL FOR NEXT