IPL 2024 MI vs RR Live Saam Digital
क्रीडा

IPL 2024 MI vs RR Live : ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर मुंबई इंडियन्स ढेर, राजस्थान रॉयल्ससमोर 126 धावांचं लक्ष्य

MI vs RR Live Today : ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर आघाडीची फळा ढेपाळली, त्यामुळे मुंबईला केवळ 126 धावांचं सोपं लक्ष्य राजस्थानसमोर ठेवता आलं आहे.

Sandeep Gawade

IPL 2024 MI vs RR Live

मुंबई इंडियन्स घरच्या मैदानावर आयपीएल 2024 मधील पहिला सामना खेळत आहे. वानखेडेवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात हंगामातील 14 वा सामना सुरू आहे. मुंबईला अद्याप विजयाचा सूर गवसलेला नाही. तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा संघ विजयरथावर स्वार आहे. हार्दिक पांड्या आणि टीमला सलग दोन सामन्यांत पराभवाला सामोरं जावं लागले. त्याचवेळी राजस्थानने घरच्या मैदानावरील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. या सामन्यात राजस्थानकडून उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर आघाडीची फळा ढेपाळली, त्यामुळे मुंबईला केवळ 126 धावांचं सोपं लक्ष्य राजस्थानसमोर ठेवता आलं आहे.

या सामन्यात मुंबईची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने 20 धावांतच 4 विकेट गमावल्या होत्या, ज्यात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने 3 आणि नांद्रे बर्गरने 1 बळी घेतला. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने 34 आणि टिळक वर्माने 32 धावा करत डावाची धुरा सांभाळली. शेवटी टीम डेव्हिडने केलेल्या 17 धावांच्या जोरावर मुंबईला 9 विकेट्सवर 125 धावांपर्यंत मजल मारली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या सामन्यात ट्रेंट बोल्टने 3 विकेट घेत मुंबईच्या टॉप ऑर्डरला तंबूत धाडलं. तर फिरकीपटू युजवेंद्र चहलने 3 विकेट्स घेत मधली फळी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. नांद्रे बर्जरने 2 तर आवेश खानने 1 बळी घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

SCROLL FOR NEXT