LSG Vs GT: भरमैदानात DRSवरून बाचाबाची; उमेश यादवच्या गोलंदाजीवेळी संतापले गुजरातचे खेळाडू
IPL 2024 LSG vs GT Social Media
क्रीडा | T20 WC

LSG Vs GT: भरमैदानात DRSवरून बाचाबाची; उमेश यादवच्या गोलंदाजीवेळी संतापले गुजरातचे खेळाडू

Bharat Jadhav

Lucknow Super Giants vs Gujarat Titans DRS Controversy:

IPL 2024 मधील 21 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एकना स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक जिंकून लखनऊच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गुजरातचे खेळाडूंची डीआरएसवरून अंपायरसोबत बाचाबाची झाली. अंपायरने बाद झाल्याचा निर्णय न दिल्याने गुजरात संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि काही खेळांडूचा पारा चढला. (Latest News)

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या पहिल्याच षटकात लखनऊच्या क्विंटन डी कॉकच्या रूपाने पहिला मोठा धक्का बसला. त्यानंतर जेवदत्त पडिक्कल फलंदाजी करत होता. त्यावेळी गुजरातकडून उमेश यादव पहिले षटक टाकत होता. या ओव्हरचा शेवटचा चेंडू पडिक्कलच्या पॅडला लागला. त्यावर उमेश यादवने जोरदार अपील केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पण अंपायरने त्याला नॉट आउट घोषित केले. यानंतर शुबमन गिलने उमेश यादवला डीआरएस घेण्यास सांगितले. तर तिसऱ्याने अंपायरने अल्ट्राएज न पाहता पडिक्कलला नाबाद घोषित केले होते. ज्यावरून कर्णधार शुभमन गिल आणि इतर खेळाडू चांगलेच संतापले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या संघाने १६३ धावा करत गुजरात संघाला विजयासाठी १६४ धावा करायच्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनऊची सुरुवात खराब झाली. अवघ्या 6 धावांमध्ये लखनऊला पहिला झटका मिळाला. त्यानंतर दुसरी विकेट 18 धावांवर गेली. लखनऊच्या मैदानात उमेश यादवने लखनऊचे दोन नवाब म्हणजेच क्किंटन डिकॉक आणि देवदत्त पडिक्कलला बाद करत लखनऊला मोठा धक्का दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

Maharashtra Monsoon Session : फ्लेमिंगोंच्या मृत्यूची अधिवेशनात चर्चा; कारणं शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना

Manoj Jarange Patil: शांतता रॅलीआधी खासदार भुमरे आणि अशोक चव्हाण जरांगे पाटलांच्या भेटीला; चर्चांना उधाण

Mumbai News : DRI ने केला रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त

Pani Puri and Cancer : पाणीपुरी खाल्ल्याने होऊ शकतो कर्करोग? वैद्यकीय तज्ज्ञ काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT