आयपीएल २०२४ चा १७ वा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. अत्यंत रोमहर्षक अशा सामन्यात पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सचा ३ विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत अनेक बदल झाले आहेत. पंजाब किंग्सच्या विजयामुळे दोन संघांना धक्का बसला आहे.
पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांनी ४ पैकी २ सामने जिंकले आहेत. दोघांचेही सध्या ४-४ गुण आहेत. पण पंजाबचा रनरेट गुजरातपेक्षा चांगला असल्यामुळे गुणतालिकेत त्यांनी गुजरातला मागे टाकलं आहे.
गुजरातचा संघ या सामन्यापूर्वी गुणतालिकेत पाचव्या स्थानावर होता, मात्र आता सहाव्या स्थानावर घसरला आहे. पंजाबचा संघ या सामन्यापूर्वी सातव्या स्थानावर होता, तो आता पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. या विजयासह पंजाबने सनरायझर्स हैदराबादलाही मागे टाकले आहे.
पंजाबने गुजरातविरुद्ध शानदार विजयाची नोंद केली आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने पंजाबसमोर २०० धावांचे लक्ष्य ठेवले होते. गुजरातकडून शुभमन गिलने ८९ धावांची जबरदस्त खेळी केली. त्यानंतर शेवटी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राहुल तेवतियाने २३ धावा चोपल्या. या खेळीच्या बळावर गुजरातने २० षटकअखेर १९९ धावा केल्या. (Cricket news in marathi)
पंजाबला हा सामना जिंकण्यासाठी २०० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात खूपच खराब झाली. अवघ्या ७० च्या धावसंख्येवर पंजाबच्या ४ विकेट्स पडल्या होत्या. पण शेवटी शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांच्या स्फोटक खेळीमुळे पंजाबने हा विजय अक्षरश: खेचून आणला. पंजाबचा या आयपीएल सीजनमधील हा दुसरा विजय आहे.
पॉईंटटेबलमध्ये कोणता संघ कितव्या स्थानावर?
१)कोलकाता नाईट रायडर्स
२)राजस्थान रॉयल्स
३)चेन्नई सुपरकिंग्स
४)लखनऊ सुपरजायन्ट्स
५)पंजाब किंग्स
६)गुजरात टायटन्स
७)सनरायझर्स हैदराबाद
८)रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर
९)दिल्ली कॅपिटल्स
१०)मुंबई इंडियन्स
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.