ipl 2024 csk vs rcb virat kohli completed 12000 runs in t20 cricket during chennai super kings vs royal challengers bangalore match  saam tv news
Sports

Virat Kohli Record: पहिल्याच सामन्यात किंग कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड! असा कारनामा करणारा ठरला पहिलाच भारतीय

CSK vs RCB, Virat Kohli Record: या सामन्यात विराटला मोठी खेळी करता आली नाही. मात्र ६ धावा करताच त्याने आयपीएल स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Record, CSK vs RCB IPL 2024:

गेले २ महिने संघाबाहेर राहिल्यानंतर विराट मैदानावर परतला आहे. कमबॅकनंतर पहिल्याच सामन्यात त्याने धमाका केला आहे. चेपॉकच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात विराटला मोठी खेळी करता आली नाही. मात्र ६ धावा करताच त्याने आयपीएल स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात ६ धावा करताच विराटने टी -२० क्रिकेटमध्ये १२००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. हा कारनामा त्याने ३६० इनिंगमध्ये केला आहे. वेस्टइंडिजचा माजी फलंदाज ख्रिस गेलने हा कारनामा ३४५ इनिंगमध्ये केला होता.

टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज..

विराट कोहली - १२०१५ धावा

रोहित शर्मा - १११५६ धावा

शिखर धवन- ९४६५ धावा

सुरेश रैना - ८६५४ धावा

केएल राहुल -७०६६ धावा

या दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश...

या रेकॉर्डसह विराट कोहलीने कायरन पोलार्ड आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. या फलंदाजांनी टी -२० क्रिकेटमध्ये १२ हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने १४५६२ धावा केल्या आहेत. (Cricket news in marathi)

हे आहेत टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज..

ख्रिस गेल - १४५६२ धावा

शोएब मलिक - १३३६० धावा

कायरन पोलार्ड- १२९०० धावा

ॲलेक्स हेल्स - १२२२५ धावा

डेव्हिड वार्नर - १२०६५ धावा

विराट कोहली- १२०१५ धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT