ipl 2024 csk vs rcb ravindra jadeja equals the record of ms dhoni cricket news in marathi  yandex
Sports

Ravindra Jadeja Record: रविंद्र जडेजाचं अनोखं शतक! मोठ्या रेकॉर्डमध्ये धोनीची बरोबरी

CSK vs RCB, IPL 2024: चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेला शानदार सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा ६ गडी राखून धुव्वा उडवला आहे.

Ankush Dhavre

Ravindra Jadeja Record News, IPL 2024:

चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएल २०२४ स्पर्धेला शानदार सुरुवात केली आहे. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा ६ गडी राखून धुव्वा उडवला आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजयासाठी १७४ धावांची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करताना रविंद्र जडेजाने शिवम दुबेसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. या सामन्यात रविंद्र जडेजाने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

जडेजाने आयपीएल स्पर्धेत रचला इतिहास..

आयपीएल स्पर्धेत धावांचा यशस्वी पाठलाग करुन सर्वाधिक वेळेस नाबाद माघारी परतण्याच्या बाबतीत एमएस धोनी अव्वल स्थानी होता. आता रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघाला विजय मिळवून तो नाबाद परतला आहे.

यासह त्याने धोनीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएलमध्ये रविंद्र जडेजा २७ वेळेस नाबाद परतला आहे. तर धोनीच्या नावेही २७ वेळेस नाबाद परतण्याची नोंद आहे. या यादीत दिनेश कार्तिक दुसऱ्या स्थानी आहे. दिनेश कार्तिक २२ वेळेस नाबाद परतला आहे. (Cricket news in marathi)

यासह रविंद्र जडेजाने आणखी एक मोठा कारनामा केला आहे. त्याने आयपीएल कारकिर्दीत १०० षटकार पूर्ण केले आहेत. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ४ षटकात ५.२० च्या सरासरीने २१ धावा खर्च केल्या. तर फलंदाजी करताना त्याने १७ चेंडूत २५ धावा खर्च केल्या. या खेळीदरम्यान त्याने एकमेव षटकार मारला. हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील १०० वा षटकार मारले आहेत.

आयपीएल स्पर्धेत धावांचा यशस्वी पाठलाग करतानात सर्वाधिक वेळेस नाबाद परतणारे फलंदाज

२७ वेळेस- एमएस धोनी

२७ वेळेस- रविंद्र जडेजा

२२ वेळेस- दिनेश कार्तिक

२२ वेळेस- यूसुफ पठान

२१ वेळेस - डेव्हिड मिलर

२० वेळेस - ड्वेन ब्रावो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT