ipl 2024 saam tv news
Sports

IPL 2024: वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाला नडणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ३ खेळाडूंना IPL ने केलं मालामाल

Australian Players In IPL Auctions 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडण्यात आला आहे. या खेळाडूंवर सर्वात मोठी बोली लागली आहे.

Ankush Dhavre

IPL Auctions 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेच्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सवर लिलावाच्या सुरुवातीलाच विक्रमी बोली लागली. सनरायझर्स हैदराबादने त्याला २०.५० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं.

इथे पॅट कमिन्स आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. मात्र अवघ्या ९० मिनिटात हा रेकॉर्ड मोडला. कारण कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कवर विक्रमी २४.७५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं.

वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेविस हेडने १३७ धावांची तुफानी खेळी करत भारतीय संघाला पराभूत करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ट्रेविस हेडला आपल्या संघात घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबादने ६.८० कोटी रुपये मोजले आहेत.

स्टार्कसाठी गुजरात अन् केकेआरमध्ये चुरशीची लढत..

मिचेल स्टार्कची बेस प्राईज २ कोटी रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सने बोली लावायला सुरुवात केली. त्यानंतर मुंबई इंडियन्सने बोली लावली. ही बोली ९.६० कोटींपर्यंत पोहचल्यानंतर मुंबईने माघार घेतली.

त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सने बोली लावायला सुरुवात केली. दोघांमध्ये चुरशीची लढत सुरु असताना २४.७५ कोटींवर गुजरात टायटन्सने माघार घेतली. यासह मिचेल स्टार्क कोलकाताच्या ताफ्यात दाखल झाला. (Latest sports updates)

पॅट कमिन्सवर लागली २०.५० कोटींची बोली..

या लिलावात २ कोटींची बेस प्राईज असलेल्या पॅट कमिन्सवर २ कोटी रुपयांची बोली लागली आहे. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स यांनी पॅट कमिन्सवर बोली लावायला सुरुवात केली. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबादचा संघ रिंगणात उतरला. अखेर सनरायझर्स हैदराबादने त्याला २०.५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane crime : ठाण्यात गुंडाची दहशत, प्रसिद्ध डॉक्टरच्या दवाखान्याची तोडफोड, व्हिडिओ समोर

Maharashtra Live News Update : - नागपूर विभागात पाच भागात असणार वीजपुरवठा बंद

Poha Ladoo Recipe : वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा लाडू, संध्याकाळची भूक जाईल पळून

'Bigg Boss 19'च्या स्पर्धकावर हिना खान भडकली, फरहाना भट्ट नेमकं काय म्हणाली?

Sangli Accident : कारने बाईकला चिरडलं, आजी-आजोबा अन् नातवाचा जागीच मृत्यू, सांगलीत भयानक अपघात

SCROLL FOR NEXT