IPL Auction 2024: मिचेल स्टार्कने काही मिनिटात मोडला IPLमधील सर्वात मोठा रेकॉर्ड, KKR ने मोजले तब्बल इतके कोटी

Mitchell Starc: मिचेल स्टार्कवर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली आहे. कोलकाताने विक्रमी बोली लावत त्याला आपल्या संघात स्थान दिले आहे.
MITCHELL  STARC
MITCHELL STARCinstagram
Published On

Mitchell Starc Becomes The Most Expensive Player In IPL History:

आयपीएल २०२४ स्पर्धेचा बिगुल मारला आहे. या स्पर्धेसाठीचा लिलाव सोहळा दुबईत सुरु आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला जात आहे. लिलावाच्या सुरुवातीलाच सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सवर विक्रमी बोली लावली होती.

आता त्याला मागे सोडत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

गुजरातने लावली विक्रमी बोली

मिचेल स्टार्कला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने बोली लावायला सुरुवात केली. ही बोली ९ कोटींच्या पुढे जातात मुंबईने माघार घेतली. त्यानंतर गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली.

गुजरातकडे ३१ कोटी आणि कोलकाताकडे ३२ कोटी शिल्लक असताना दोन्ही फ्रेचांयझींनी बोली लावताना माघार घेतलीच नाही. २१ कोटींवर आयपीएल स्पर्धेच्या सर्वाधिक बोलीचा रेकॉर्ड मोडला. मात्र हे दोन्ही संघ इथेही न थांबता बोली लावत राहिले.

अखेर २४.७५ कोटींच्या बोलीवर गुजरातने माघार घेतली आणि आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोलकाता नाईट रायडर्स संघात दाखल झाला. (Latest sports updates)

MITCHELL  STARC
IPL 2024 Auction: हे आहेत IPL स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

मिचेल स्टार्कने यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ५८ सामन्यांमध्ये ७३ गडी बाद केले आहेत.

यादरम्यान २० धावा खर्च करत ४ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामिगिरी राहिली आहे. तर टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने १२१ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १७० फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे. यादरम्यान १५ धावा खर्च करत ४ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

MITCHELL  STARC
IPL 2024 Auction: मोठी बातमी! लिलावाच्या काही तासांपूर्वीच ३ स्टार खेळाडूंनी आपलं नाव घेतलं मागे; कारणंही आलं समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com