IND vs AUS,1st ODI: ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्का! 2 स्टार खेळाडू भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेला मुकणार

India vs Australia,1st ODI: भारतीय संघाविरूद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.
mitchell starc and glenn maxwell will not available for india vs aus 1st odi says pat cummins
mitchell starc and glenn maxwell will not available for india vs aus 1st odi says pat cummins saam tv
Published On

India vs Australia,1st ODI:

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे .

या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी दिलासादायक तर ऑस्ट्रेलियन फॅन्सची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यातून मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल बाहेर झाला आहे.

mitchell starc and glenn maxwell will not available for india vs aus 1st odi says pat cummins
World Cup 2023: नशीबच खराब! वर्ल्डकपपूर्वी २ प्रमुख खेळाडू संघाबाहेर; मोठं कारण आलं समोर

पहिल्या वनडे सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने म्हटले की, 'मला आता बरं वाटतंय. माझा बोट पूर्णपणे ठिक आहे. मला असं वाटतंय की,मी तिन्ही सामने खेळू शकतो. उद्या होणाऱ्या सामन्यात स्टार्क नसणार आहे. अशी आशा करतो की, तो पुढील सामन्यात खेळताना दिसेल. ग्लेन मॅक्सवेल देखील संघाबाहेर असणार आहे. आम्ही वर्ल्डकपपूर्वी संघात समतोल साधण्याचा प्रयत्न करतोय.'

तसेच त्याने संघातील अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथबाबत देखील अपडेट दिली आहे. भारतीय संघाविरूद्धच्या पहिल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथ खेळताना दिसेल असं पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं आहे. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाची चिंता वाढवणारी बाब..

मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल बाहेर झाल्याने ऑस्ट्रेलिया संघाच्या चिंतेत भर पडली आहे. कारण हे दोघेही संघातील प्रमुख खेळाडू आहेत.

मिचेल स्टार्कच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, ११० वनडे सामन्यांमध्ये त्याने २१९ गडी बाद केले आहेत. यादरम्यान २८ धावा खर्च करत ६ गडी बाद ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

mitchell starc and glenn maxwell will not available for india vs aus 1st odi says pat cummins
IND vs AUS,1st ODI: मोहालीत ऑस्ट्रेलियाला हरवणं कठीण नव्हे तर अशक्यच! पाहा टीम इंडियाची चिंता वाढवणारा रेकॉर्ड

भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श, जोश इंग्लिस, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मार्कस स्टोइनिस, कॅमरून ग्रीन, पॅट कमिंस (कर्णधार),अॅडम झाम्पा, जोश हेजलवुड, नॅथन अॅलिस, सीन एबॉट, मॅथ्यू शॉर्ट , स्पेंसर जॉनसन, तनवीर संघा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com