DC vs SRH Match Updates Saam TV
Sports

DC vs SRH Match: अभिषेक शर्मा, हेनरी क्लासेनची धुव्वाधार फलंदाजी; हैदराबादचे दिल्लीला १९८ धावांचे आव्हान

DC vs SRH Match Updates: सनराईजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्समध्ये विजयासाठी १९८ धावांचं आव्हान ठेवलं आहे.

Satish Daud

DC vs SRH Match Updates: सलामीवीर अभिषेक शर्माची 36 चेंडूत 63 धावांची धडाकेबाज खेळी आणि मधल्या फळीचा फलंदाज हेनरी क्लासेनने ठोकलेल्या २७ चेंडूत ५३ धावांच्या जोरदावर सनराईजर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्समध्ये विजयासाठी १९८ धावांचं आव्हान ठेवलं आहे. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात १९७ धावा चोपल्या. दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. (Latest Marathi News)

दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सनराईजर्स हैदराबादने धडाकेबाज सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हैदराबादला पावर प्लेमध्ये दोन धक्के बसले. अभिषेक शर्मासोबत सलामीला आलेल्या मयांक अग्रवालला इशांत शर्माने माघारी पाठवलं. अग्रवालने ६ चेंडूत ५ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला राहुल त्रिपाठी सुद्धा लवकर बाद झाला. त्रिपाठीने ६ चेंडूत १० धावांची खेळी केली. त्याला मिचेल मार्शने बाद केलं.

यानंतर आलेला राहुल त्रिपाठी देखील फार काही चमक दाखवू शकला नाहीत 6 चेंडूत 10 धावा करत तो मिचेल मार्शच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र यानंतर अभिषेक शर्माने फटकेबाजी करत २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. एकीकडे अभिषेक शर्मा आक्रमक अवतारात फलंदाजी करत होता दुसरीकडे मिचेल मार्श हैदराबादला धक्क्यावर धक्के देत होता.

आधीच राहुल त्रिपाठीची शिकार केलेल्या मार्शने हैदराबादचा कर्णधार एडन माक्ररमला ८ धावांवर आणि हॅरी ब्रुकला शुन्यावर बाद केले. यानंतर अभिषेक शर्मा ३६ चेंडूत ६३ धावा करून अक्षर पटेलची शिकार झाला. मिचेल मार्शने हैदराबादला पाठोपाठ धक्के दिल्यानंतर अब्दुल समाद आणि क्लासेन यांनी सहाव्या विकेटसाठी जवळपास ५ षटकात अर्धशतकी भागीदारी रचत हैदराबादला १६० धावांच्या पार पोहचवले. मात्र ही जोडी अखेर मार्शनेच फोडली. त्याने अब्दुल समदला घरचा रस्ता दाखवला. समदने २१ चेंडूत २८ धावा केल्या.

एकवेळ हैदराबादचा संघ १७० ते १८० धावाच करेल असं वाटत असताना अकिल हुसेन हा मैदानावर आला. त्याने शेवटच्या काही षटकात क्लासेनसोबत फटकेबाजी करत हैदराबादला मजबूत स्थितीत नेलं. क्लासेनने २७ चेंडूत ५३ धावा कुटल्या. तर अकिल हुसेन १० चेंडूत १६ धावा काढून नाबाद राहिला. दिल्लीकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेल आणि इशांत शर्माने प्रत्येकी १ गड्यांना बाद केलं.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जीवाशी खेळ! पुण्यात बनावट गुटख्याचा कारखाना; पोलिसांकडून कारवाईत १ कोटींचा मुद्देमाल जप्त

Akola News: अकोल्यात विद्यार्थ्यांकडून पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे? व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Maharashtra Live News Update : दिल्ली विमानतळावर इंडिगो फ्लाईटमध्ये २५० हून अधिक प्रवासी अडक

Navale Bridge: एक चूक पडेल महागात! नवले पुलावरील अपघातांनंतर मोठा निर्णय, पुणे पोलिसांकडून नवीन नियमावली जाहीर

पनवेलजवळ अपघात, रेल्वे ट्रॅकवरून मालगाडी घसरली, VIDEO

SCROLL FOR NEXT