Yashasvi Jaiswal IPL Twitter
क्रीडा

IPL 2023, RR vs CSK: यशस्वीची तुफान फटकेबाजी, राजस्थानचं चेन्नईसमोर 203 धावांचं तगडं आव्हान

IPL 2023, RR vs CSK: यशस्वीने 43 चेंडूत 77 धावांची धडाकेबाज खेळी केली.

प्रविण वाकचौरे

IPL 2023, RR vs CSK: आयपीएलमधील 37वा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्समध्ये सुरु आहे. राजस्थानने चेन्नईसमोर 202 धावांचा डोंगर उभा केला आहे. राजस्थानचे फलंदाज चेन्नईच्या गोलंदाजांवर तुटून पडले. चेन्नईसमोर आता विजयासाठी 203 धावांचं लक्ष्य आहे.

राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक धावा केल्या. यशस्वीने 43 चेंडूत 77 धावांची धडाकेबाज खेळी केली. ज्यामध्ये 4 षटकार आणि 8 चौकारांचा साज होता. (Latest Marathi News)

यशस्वीसोबत ओपनिंगला आलेल्या जोस बटलरने 21 चेंडून 27 धावांची सयंमी खेळी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 86 धावांची भागिदारी केली. रविंद्र जडेजाने बटलरला आपल्या फिरकी अडकवलं. त्यानंतर आलेल्या कर्णधार संजू सॅमसंग 17 चेंडूत 17 धावा केल्या. (Sports News)

तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जाणारा शेमरॉन हेटमायर आज स्वस्तात माघारी फिरला. हेटमायरने 10 चेंडूत 8 धावा केल्या. शेवटच्या काही षटकांमध्ये ध्रुव जुरेट आणि देवदत्त पडिक्कलने स्फोटक फलंदाजी करत 20 चेंडूत 48 धावांची भागिदारी केली. जुरेलने 15 चेंडूत 23 धावा केल्या. ज्यात तीन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.

तर पडिक्कलने 13 चेंडूत 23 धावांची खेळी केली. चेन्नईकडून तुषार देशपांडेने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर महिश तीक्षणा आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranji Trophy 2024-25: कुंबळेनंतर दुसरा भारतीय गोलंदाज अंशुल कंबोज, एकाच इंनिगमध्ये घेतले १० विकेट्स

VIDEO : क्षणभर विश्रांती! आदित्य ठाकरेंनी प्रचारादरम्यान लुटला गल्ली क्रिकेटचा आनंद

Liver Health: हे '४' पेय करतात यकृतावर गंभीर परिणाम ; तुम्हीही करता का या पेयांचे सेवन, वेळीच व्हा सावध

Maharashtra News Live Updates: गुजरातच्या पोरबंदरवरून मोठा अमली पदार्थांचा साठा जप्त

Maharashtra Politics : भाजपला विनंती, उद्धव ठाकरे म्हणाले मी बोलणी करायला तयार

SCROLL FOR NEXT