Virat Kohli Saamtv
Sports

IPL 2023 Rcb vs DC: रनमशिन कोहलीचा 'विराट' विक्रम! अशी कामगिरी करणारा IPL च्या इतिहासातील पहिलाच फलंदाज

RCB Vs DC: कोहलीने अरूण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात इतिहास रचला.

Gangappa Pujari

Virat Kolhi New Record In IPL: रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अरूण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरूद्धच्या सामन्यात इतिहास रचला. सलामीला आलेल्या विराट कोहलीने आयपीएलमध्ये 7000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो आयपीएल इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला. 34 वर्षाच्या विराट कोहलीने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर चौकार मारत आपल्या आयपीएल 7000 धावा थाटात पूर्ण केल्या. (Latest Marathi News)

इंडियन प्रीमियर लीग( IPL) असो वा टीम इंडियाचा मंच विराट कोहली (Virat Kohli) एका मोठ्या मुक्कामवर पोहोचला आहे. विराट कोणत्या ना कोणत्या विक्रमाला गवसणी घालताना दिसत आहे. दिल्लीचा घरेलू मैदान अरुण जेटली स्टेडियममध्ये विराटने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराटने या इनिंगमध्ये १२ धावा केल्यानंतर आयपीएलमध्ये त्याच्या सात हजार धावा पूर्ण झाल्या.

अक्षर पटेलच्या दुसऱ्या षटकात विराटने एक धाव काढून हा मोठा विक्रम केला. सामन्याआधी या धावांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला १२ धावांची आवश्यकता होती. विराट पाठोपाठ पंजाबचं नेतृत्व करणाऱ्या शिखर धवननेही २१३ सामन्यांमध्ये ६५३६ धावा केल्या आहेत. विराटनंतर तो अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्यानंतर वॉर्नर (६१८९) धावा करून तिसऱ्या स्थानावर आहे. तर रोहित शर्मा (६०६३) चौथ्या नंबरवर आहे.

अर्धशतकांचे अर्धशतक...

दरम्यान, विराट कोहलीने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 46 बॉलमध्ये 5 फोरच्या मदतीने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. विराटच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 50 वं अर्धशतक ठरले. विराट यासह आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला. विराटच्या नावावर 50 अर्धशतकांची नोंद आहे. तर या यादीत डेव्हिड वॉर्नर हा 59 अर्धशतकांसह अव्वल स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT