ipl playoffs saam tv
Sports

IPL 2023 Playoffs Race: डायरीत नोट करून ठेवा! हेच '४' संघ करणार Playoff मध्ये प्रवेश

IPL Playoffs Scenario: पाहा कोणते ४ संघ जाणार प्लेऑफमध्ये

Ankush Dhavre

IPL Playoff Equation: राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्ज संघावर ४ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह राजस्थानचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहे. राजस्थान रॉयल्सचा संघ १४ पॉइंट्ससह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर चांगला नेट रन रेटच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ चौथ्या स्थानी आहे. दिल्ली, पंजाब आणि हैदराबाद संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे. आतापर्यंत ६७ सामने झाले आहेत. तरीदेखील प्लेऑफमध्ये जाणारे ४ संघ कोणते? हे कळू शकलेलं नाहीये. गुजरात टायटन्स संघ हा प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा एकमेव संघ आहे. तर उर्वरित ३ स्थानांसाठी ६ संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. ज्यात चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, लखनऊ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा समावेश आहे.

लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाने जर आज होणाऱ्या सामन्यांमध्ये विजय मिळवला तर हा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. मात्र या संघांना जर पराभवाचा सामना करावा लागला तर, दुसऱ्या संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल. चेन्नईचा शेवटचा सामना हा दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध रंगणार आहे. तर लखनऊचा सामना हा कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध रंगणार आहे. (Latest sports updates)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला अजुनही संधी...

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाला धूळ चारत स्वतःला प्लेऑफच्या शर्यतीत कायम ठेवलं आहे. या संघाला शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यासह दुसऱ्या संघांच्या निकालावर देखील अवलंबून राहावं लागणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा शेवटचा सामना गुजरात टायटन्स संघासोबत रंगणार आहे.

मुंबई प्लेऑफमध्ये जाणार का?

मुंबई इंडियन्स संघ देखील प्लेऑफच्या शर्यतीत टिकून आहे. १३ पैकी ७ सामने जिंकून मुंबईचे १४ पॉइंट्स आहेत. मात्र मुंबईचा नेट रन रेट हा - ०.१२८ इतका आहे. त्यामुळे मुंबईला शेवटचा सामना केवळ जिंकायचा नाहीये तर तो मोठ्या फरकाने जिंकायचा आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचा संघ देखील प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: आधी डॉक्टर झाली, पहिल्याच प्रयत्नात केली UPSC क्रॅक; बस कंडक्टरची लेक झाली IAS अधिकारी

Navpancham Rajyog: उद्यापासून चमकणार 'या' राशींचं नशीब; बुध-यम यांच्यामुळे नवपंचम राजयोग तयार होऊन मिळणार पैसा

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

SCROLL FOR NEXT