ipl Saam Tv
क्रीडा

IPL 2023: BCCI चं टेन्शन वाढलं! IPL स्पर्धेवर कोरानाचं सावट , दिग्गज खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह, आता पुढे काय?

Aakash Chopra Corona Positive: ही स्पर्धा सुरु असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे.

Ankush Dhavre

IPL 2023 Latest News: भारतात सध्या सर्वत्र आयपीएलची चर्चा सुरु आहे. या स्पर्धेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. दरम्यान ही स्पर्धा सुरु असतानाच एक मोठी बातमी समोर येत आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर अली आहे. (IPL 2023 Commentator Aakash Chopra tests positive for Corona Virus)

आकाश चोप्रा हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'कोरोनाने पुन्हा माझ्यावर हल्ला केला आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवली असल्याने मी काही दिवस समालोचन करताना दिसून येणार नाही. घसा खराब झाल्याने आवाजावर परिणाम होऊ शकतो.' (Latest sports updates)

आकाश चोप्रा हा प्रसिद्ध भारतीय समालोचक आहे. तो आयपीएल २०२३ स्पर्धेत जिओ सिनेमासाठी हिंदी भाषेत सामालोचन करताना दिसून येत आहे. आता आकाश चोप्रा समालोचन करणार नसल्याने नक्कीच त्याच्या चाहत्यांना त्याची कमतरता जाणवणार आहे.

यापूर्वी देखील आकाश चोप्राला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी देखील त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली होती. तसेच आयपीएल स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर ही स्पर्धा ३१ मार्च पासून सुरु झाली असून २८ मे रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit: महाराष्ट्र हरलास तू ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी पोस्ट, म्हणाली...

Dharmarao Baba Atram: शरद पवारांचं राजकारण संपलं, विजयी होताच धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान

Belapur : संदीप नाईकांचा 377 मतांनी निसटता पराभव, अपक्ष संदीप नाईकांना 513 मते, तुतारीसारख्या ट्रम्पेटलाही भरघोस मते

Yashasvi Jaiswal: पर्थवर यशस्वी जयस्वाल नावाचं तुफान; कांगारू गोलंदाजांची धुलाई करत ठोकलं शतक

Maharashtra News Live Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लवकरच महायुती सामोरे जाणार

SCROLL FOR NEXT