Suryakumar Yadav Saam TV
Sports

IPL 2022: सूर्यकुमार यादवने सांगितली 'SKY' नावामागील रंजक कहाणी

आयपीएल हे भारतातील क्रिकेटचे माहेर घर समजले जाते. आपले टॅलेंट दाखवण्यासाठी आयपीएल हे एक व्यासपीठ आहे.

Pravin

आयपीएल हे भारतातील क्रिकेटचे माहेर घर समजले जाते. आपले टॅलेंट दाखवण्यासाठी आयपीएल हे एक व्यासपीठ आहे. इंडियन प्रीमियर लीगने (IPL 2022) देशातील आणि जगाच्या क्रिकेटला अनेक अव्वल दर्जाचे टॅलेंट दिले आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav). कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) आयपीएलचा प्रवास सुरू करणारा सूर्यकुमार यादव आता मुंबई इंडियन्सकडून खेळतो. सुर्याकडे आयपीएलमधील उत्कृष्ट खेळाडू म्हणून पाहिले जाते. मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीचा कणा म्हटला जाणारा सूर्यकुमार यादव त्याच्या 'SKY' या टोपणनावाने ओळखले जाते. इंग्रजी शब्दकोशात SKY चा अर्थ शोधला तर त्याचा अर्थ आकाश असा होईल. पण भारतीय क्रिकेटमध्ये त्याचा संबंध सूर्यकुमार यादवशी आहे.

आता प्रश्न असा आहे की सूर्यकुमार यादवला SKY हे नाव कसे पडले? त्याचे सहकारी त्याला कधी SKY म्हणू लागले? तर या प्रश्नांमागील उत्तर 8 वर्षे जूने आहे, ज्याचा खुलासा खुद्द सूर्यकुमार यादवने 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' नावाच्या यूट्यूब शोमध्ये केला आहे.

गौतम गंभीरने दिले 'SKY' हे टोपण नाव

सूर्यकुमार यादवने 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स'मध्ये सांगितले की, त्याला हे नाव पहिल्यांदा गौतम गंभीरने दिले होते. तो म्हणाला, "गोष्ट 8 वर्षे जुनी आहे, म्हणजे 2014 साली, जेव्हा तो KKR संघाचा भाग होता आणि गौतम गंभीर त्या संघाचा कर्णधार होता." सूर्यकुमार पुढे म्हणाला, “मी 2014 मध्ये केकेआरमध्ये असताना तेव्हा गौतीभाईने मला मागून दोन-तीन वेळा SKY हाक मारली होती. सुरुवातीला मी त्याकडे लक्ष दिले नाही. तेव्हा तो म्हणाला की मी तुलाच बोलावतोय. SKY म्हणजे Surya Kumar Yadav.

एमआयच्या ड्रेसिंग रूममधील सीटची कहाणी

सूर्यकुमार यादवला SKY हे नाव कसे पडले ते तुम्हाला झाले. आता जाणून घ्या मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममधील त्याच्या सीटची कहाणी, ज्यावर तो नेहमी बसतो. सूर्यकुमार यादव म्हणाला, "जेव्हा तो पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला तेव्हा तिथे बसायला जागा नव्हती. तो आपली किट बॅग घेऊन उभा होता. तेव्हा सचिन तेंडुलकरने त्याला जवळ येऊन बसण्यास सांगितले. सचिन तेंडुलकर गणेशाच्या मूर्तीजवळ बसायचा. सचिन तेंडुलकरच्या आवाजावर मी गेलो आणि त्याच्या शेजारी बसलो. आता तेव्हापासून मी तिथेच बसतो.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT