IPL 2022 : आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव ; 'BCCI' वर पुन्हा येऊ शकतं मोठं संकट

Delhi capitals
Delhi capitals saam tv
Published On

मुंबई : आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव (corona in ipl 2022) झाल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या पाच खेळाडूंना कोरोनाची लागण झालीय. दरम्यान, आयपीएलमध्ये कोरोनाच्या झालेल्या विस्फोटानंतर बीसीसीआयने (bcci) मोठा निर्णय घेतला आहे. आता दिल्ली कॅपिटल्स (Delhi capitals) आणि पंजाब किंग्जमध्ये (punjab kings) होणारा सामना पुणे ऐवजी मुंबईत खेळवला जाणार आहे. दिल्लीच्या संघातील पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याने सामना मुंबईत खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान, कोरोना महामारी (corona pandemic) सुरु झाल्यानंतर २०२१ मध्ये आयपीएलच्या सामन्यांवर मोठा परिणाम झाला होता. त्यावेळी ४ मे २०२१ ला आयपीएलचे सामन्यांचा खेळ मध्यंतरीच बंद करण्यात आला होता. सनराइजर्स हैद्राबादचा यष्टीरक्षक रिद्धीमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने आयपीएलचे सामने थांबवण्यात आले होते. त्यामुळे आताही कोरोनाच्या संकट गडद झाल्यास बीसीसीआयवर मोठं संकट येण्याची शक्यता आहे.

Delhi capitals
IPL 2022: लखनौ समोर बंगळुरूचे 'चॅलेंज'; अशी असेल प्लेईंग-11

'या' खेळाडूंना कोरोनाची बाधा

१) पॅट्रिक फरहात (फिजियो)

२) चेतन कुमार (मसाज थेरेपिस्ट)

3.  मिचेल मार्श ( खेळाडू)

4.  अभिजीत साळवी (डॉक्टर)

5.  आकाश माणे (सोशल मीडिया टीम)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर खेळाडूंना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. विलगीकरणाच्या सहाव्या किंवा सातव्या दिवशी सर्व खेळाडूंची टेस्ट करण्यात येईल. यानंतरच पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये १६ एप्रिलनंतर संपूर्ण कॅम्पमध्ये दररोज आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. २० एप्रिलला सकाळी संपूर्ण टीमची चाचणी केली जाणार आहे.

यापूर्वी दिल्ली फ्रॅंचायजीने म्हटलं होतं की, दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर त्याला रुग्णलयात दाखल करण्यात आलं. दिल्ली कॅपिटल्सची आरोग्य यंत्रणा खेळाडूंची काळजी घेत आहेत. तसंच दिल्लीच्या सपोर्ट स्टाफलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र, त्यांच्यात कोरोणाची लक्षणं नाहीत. कोविडचा अहवाल आल्यानंतर दिल्लीचे सर्व खेळाडू विलगीकरणात होते. खेळाडूंनी पुण्यात जाऊ नये जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, असं आवाहनही बीसीसीआयकडून केलं जात आहे. आज मंगळवारी सकाळी दिल्लीच्या सर्व खेळाडूंची चाचणी करण्यात आलीय. या चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

बीसीसीआयचं संकट वाढणार ?

कोरोना महामारीत आयपीएलच्या सामन्यांवर मोठा परिणाम झाला होता. त्यावेळी ४ मे २०२१ ला आयपीएलचे सामन्यांचा खेळ मध्यंतरीच बंद केला होता. सनरायझर्स हैद्राबादचा यष्टीरक्षक रिद्धीमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने आयपीएलचे सामने थांबवण्यात आले. त्यामुळे आताही कोरोनाच्या संकटामुळं बीसीसीआयवर संकट येऊ शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com