IPL 2022 | RCB vs GT
IPL 2022 | RCB vs GT Hardik Pandya
क्रीडा | IPL

IPL 2022: RCB चा विजय अन् दोन संघांचा पत्ता कट? आज गुजरातशी सामना

Pravin

IPL 2022 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) विरुद्ध गुजरात टायटंस (Gujarat Titans) यांच्यात सामना होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती हा सामना रंगणार आहे. दोन्हीही संघाचा हा साखळी सामन्यांतील शेवटचा सामना आहे. बेंगलोरच्या संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आजचा सामना जिकणे अनिवार्य आहे.

एका बाजूला हार्दीक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली गुजरातचा संघ सर्वात अगोदर प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. गुजरातच्या संघाने प्लेऑफसोबतच पहिल्या दोन संघांमध्ये आपली जागा पक्की केली आहे, त्यामुळे संघाला प्लेऑफमध्ये दोन सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला फाफ ड्युप्लेसीसच्या नेतृत्वात आरसीबीच्या संघाला आजचा सामना जिंकावा लागणार आहे. आजचा सामना जर आरसीबीचा संघ हारला तर त्यांचं आव्हान संपुष्टात येणार आहे.

विराट कोहलीचा फॉर्म संघासाठी चिंतचा विषय आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात विराट कोहलीने एकही मोठी खेळी खेळलेली नाही. विराट कोहली आणि फाफ ड्युप्लेसीसकडून अपेक्षा आहे की ते दोघे चांगला खेळ करुन आपल्या संघाला प्लेऑफमध्ये घेवून जातील. विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधार पद हंगामाआधी सोडले होते. परंतु संघाने कोहलीला सोडले नाही. विराट कोहलीला 15 कोटी रुपये देऊन संघाने रिटने केले होते.

विराट कोहली अनुभवी खेळाडू आहे आणि मोठ्या सामन्यात विराटला आपला संभाव्य खेळ करावा लागणार आहे. आरसीबीने आतापर्यंत 13 सामन्यात 7 विजय मिळवले आहेत. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी संघाला आजचा सामना जिंकणे गरजेचा आहे म्हणजे त्यांचे 16 अंक होतील.

संभाव्य संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.

गुजरात टायटन्स

ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, अल्झारी जोसेफ, यश दयाल, मोहम्मद शमी.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR : राजस्थानच्या तोंडचा घास हैदराबादने हिसकावला; रोमहर्षक सामन्यात 1 रन्सने हैदराबादचा राजस्थानवर विजय

Mangoes: दीर्घकाळापर्यंत आंबे कसे ठेवाल ताजेतवाने

Beet juice : या लोकांनी चुकूनही पिऊ नये बीटचा ज्यूस

Dharashiv News : धाराशिवमध्ये १६ बालकांना इंजेक्शनची रिअॅक्शन; ताप, उलटीमुळे हैराण

Special Report : Pune Lok Sabha | भाजपची हॅट्रीक की कॉंग्रेसचं कमबॅक?

SCROLL FOR NEXT