IPL 2022: 17 कोटी मिळालेला केएल राहुल म्हणाला मला अजून पैसे द्या, कारण...

कोलकाताला 2 चेंडूत फक्त 3 धावा हव्या होत्या पण मार्कस स्टॉइनिसने सलग दोन विकेट घेत संपूर्ण सामना आपल्या पारड्यात खेचून आणला.
K L Rahul
K L RahulSaam TV

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये, असे सामने अनेकदा पाहायला मिळतात जे चाहत्यांना भरपूर आनंद देतात. परंतु बुधवारी झालेल्या सामन्याने लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार आणि संपुर्ण संघाला आनंदाच्या शिखरावर पोहचवले. महत्त्वाचं म्हणजे केएल राहुलचा संघ लखनौ सुपरजायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants) अवघ्या 2 धावांनी पराभव केला. या सामन्यात लखनौचा पराभव निश्चित वाटत होता कारण कोलकाताला 2 चेंडूत फक्त 3 धावा हव्या होत्या पण मार्कस स्टॉइनिसने सलग दोन विकेट घेत संपूर्ण सामना आपल्या पारड्यात खेचून आणला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केएल राहुल म्हणाला झालेला सामना खूपच रोमांचक झाला अशा सामन्यासाठी मला जास्त पैसे मिळायला हवेत.

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार गमतीने म्हणाला, 'मला अशा सामन्यांसाठी जास्त पैसे मिळायला हवेत. असे सामने आम्ही खूप मिस करत होतो. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेले खूप कमी सामने झाले आहेत. आम्ही सामना जिंकल्याचा खूप आनंद झाला. सामन्यात परिस्थीती अशी होती की आम्ही सामना सहज गमावला असता. दोन्ही संघांनी उत्कृष्ट क्रिकेट खेळले. आम्ही ऐवढी मोठी धावसंख्या उभारुनही सामना तीन धावांनी जिंकलो आमची कामगिरी नक्कीच निराशजनक झाली असे केएल राहुल बोलला.

K L Rahul
अर्ध्यावरती डाव सोडला...'या' संघाचा कर्णधारच परतला मायदेशात, कारण...

मार्कस स्टॉइनिसने प्लॅननुसार गोलंदाजी केली

केएल राहुलने (KL Rahul) सांगितले की मार्कस स्टॉइनिस आपल्या ठरवलेल्या प्लॅनवरती ठाम राहिला आणि त्यामुळेच संघ जिंकला. केएल राहुल म्हणाला, 'मला माहित होते की केकेआर आमच्याविरुद्ध जोरदार प्रत्युत्तर देईल. त्यांनी चांगली फलंदाजीही केली. मात्र, टाईम आऊट दरम्यान आम्ही ठरवले की फक्त आमचे सर्वोत्तम चेंडूच वापरायचे. ज्या क्षणी आम्ही आमच्या प्लॅनपासून दूर जाऊ तेव्हा आम्ही सामना सहज गमावला. या सामन्यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. असे सामने संघाला भरपूर काही शिकवतात.

राहुलला डिकॉकची खात्री पटली

केएल राहुलने यष्टिरक्षक क्विंटन डी कॉकचे कौतुक केले. राहुल म्हणाला की, शेवटच्या षटकांमध्ये मी फक्त प्रेक्षक होतो. डिकॉकने अप्रतिम फलंदाजी केली. केएल राहुल म्हणाला, 'आमचे फलंदाज फक्त ३० ते ४० धावा करत होते, आम्हाला मोठी धावसंख्या उभारणारे फलंदाज हवे होते आणि तेच डिकॉकने केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com