इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2022) 30 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स यांच्यात होणार आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना होणार आहे. शेवटचा सामना जिंकून दोन्ही संघ छान दिसत आहेत. दोन्ही संघ अतिशय फॉर्ममध्ये होते. दोन्हीही संघ विजयाचे प्रबळ दावेदार आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौचा संघ प्रभावी कामगिरी करत आहे. त्याचबरोबर फाफ-ड्यू-प्लेसीसच्या नेतृत्वात आरसीबीचा संघ विजय घोडदौड कायम ठेवत आहे.
लखनौ सुपर जायंट्स
लखनौ सुपर जायंट्स यंदाच्या हंगामातील नवा संघ. पहिल्या सामन्यात त्यांना गुजरात टायटन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर लखनौने सलग तीन विजयांसह शानदार पुनरागमन केले. संघाने चेन्नई, हैदराबाद आणि दिल्लीचा पराभव केला. यानंतर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर संघाने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आतापर्यंत झालेल्या 6 सामन्यांमध्ये संघाने 4 विजयांची नोंद केली आहे.
संभाव्य संघ
लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, क्रुणाल पांड्या, आयुष बडोनी, जेसन होल्डर, दुष्मंत चमीरा, आवेश खान, रवी बिश्नोई.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
आरसीबीनेही यंदाच्या मोसमाची सुरुवात पराभवाने केली. मात्र त्यानंतर संघाची चुरस पाहायला मिळाली. आरसीबीने केकेआर, राजस्थान आणि मुंबई इंडियन्सचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. आरसीबीने 6 सामने खेळले आहेत, 4 जिंकले आहेत तर 2 गमावले आहेत.
संभाव्य संघ
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, सुयश प्रभुदेसाई, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, वानिंदो हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.