IPL 2022- KKR vs MI Saam TV
क्रीडा

IPL 2022: मुंबईला पहिल्या विजयाची प्रतीक्षा; KKR चा दिग्गज ताफ्यात दाखल

KKR vs MI: कारण केकेआरच्या गोलंदाजांसमोर इशान किशनचा रेकॉर्ड खूपच खराब आहे.

वृत्तसंस्था

MI vs KKR: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स पुण्यात आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात सर्वांच्या नजरा मुंबईचा युवा सलामीवीर इशान किशनवर (Ishan Kishan) असणार आहे. पहिल्या दोन सामन्यात त्याने अर्धशतके झळकावली असून तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. पण कोलकात्यासमोर त्याती अग्नीपरीक्षा असणार आहे.

कारण केकेआरच्या गोलंदाजांसमोर इशान किशनचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. उमेश यादव, टीम साऊथी, पॅट कमिन्स आणि सुनील नारायन या गोलंदाजांसमोर इशानला धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. IPL 2022 मध्ये आपला पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स झगडत आहे. केकेआरने मागच्या सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. IPL 2022 मध्ये KKR साठी चांगली कामगिरी करणाऱ्या उमेश यादवचा सामना इशानने या अगोदर केलेला आहे. इशान सुनील नारायण, पॅट कमिन्स, टीम साऊदीसमोर धावा करण्यासाठी झगडत आहे. या अगोदर पॅट कमिन्सने इशानला दोन वेळा बाद केले आहे.

दोन सामन्यात दोन अर्धशतक

इशान किशनचे केकेआरसोबत आकडे काही खास नाहीत परंतु आयपीएल 2022 मध्ये त्याने आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आहे. इशानने या मोसमातील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नाबाद 81 धावांची खेळी केली. या डावात किशनने 48 चेंडूंचा सामना करत 11 चौकार आणि 2 षटकार ठोकले. त्यानंतर राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 43 चेंडूत 54 धावा केल्या. या खेळीत किशनने पाच चौकार आणि एक षटकार लगावला.

संभाव्य संघ

मुंबई (MI)

इशान किशन, रोहित शर्मा (कर्णधार), टीम डेव्हिड, अनमोलप्रीत सिंग, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डॅनियल सॅम, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थंपी, मुरुगन अश्विन.

कोलकात (KKR)

अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्ज, नितीश राणा, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शिवम मावी, उमेश यादव, टिम साउथी, वरुण चक्रवर्ती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवारांची सोशल मीडियावरून चेतन तुपेंवर टीका

GRAP-4 लागू करण्यास तीन दिवसांचा विलंब का? दिल्लीतील प्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतला कठोर निर्णय

High Court : भिकारी बोलणं अपमानजनक नाही, न्यायालयाचं महत्त्वपूर्ण मत

General Knowledge: दारू व्हेज की नॉनव्हेज? काय आहे खरं उत्तर?

Success Story: १५०० रूपयांच्या बिझनेसला ३ कोटींपर्यंत पोहोचवलं, जाणून घेऊया संगीता यांची यशोगाथा

SCROLL FOR NEXT