IPL 2022
IPL 2022 Twitter/ @BCCI/ @IPL
क्रीडा | IPL

IPL 2022: 14 वर्षांच्या इतिहासात BCCI ची सर्वात जास्त कमाई...

वृत्तसंस्था

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड, BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या झोळीत मोठी रक्कम पडणार आहे. गेल्या 14 वर्षांप्रमाणे, पुन्हा एकदा भारतीय बोर्ड सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठी T20 लीग इंडियन प्रीमियर लीगद्वारे (IPL 2022) मोठी कमाई करणार आहे. 26 मार्चपासून सुरू होणाऱ्या 15 व्या मोसमातून बोर्डाला किती कमाई होणार आहे, हे स्पर्धा पूर्ण झाल्यानंतरच कळेल, मात्र सध्यातरी प्राथमिक माहिती अशी आहे की, बीसीसीआयला केवळ स्पॉन्सरशिपमधून 800 कोटी रुपयांची प्रचंड कमाई होणार आहे. जे स्पर्धेच्या इतिहासातील एका हंगामातील हे सर्वात जास्त असणार आहे.

बीसीसीआयने यंदा आयपीएलचा टायटल स्पॉन्सर बदलला आहे, तर काही नवीन प्रायोजकही लीगशी जोडले गेले आहेत आणि त्यामुळे बीसीसीआयचे बँक खाते पूर्वीपेक्षा अधिक भरले जाणार आहे. एका अहवालानुसार, टाटाचे टायटल (Tata) स्पॉन्सर बनण्याव्यतिरिक्त, यावेळी लीगसाठी 9 मोठे ब्रँड प्रायोजकत्वाखाली जोडले गेले आहेत, जे बीसीसीआयला या हंगामात 800 कोटी रुपये देणार आहेत.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई

माध्यमांच्या अहवालनुसार, भारत सरकारची ऑनलाइन पेमेंट सेवा प्रणाली RuPay आणि फूड डिलिव्हरी अॅप Swiggy Instamart यांनी बोर्डासोबत करार केला आहे. याअंतर्गत रुपेचे 42 कोटी आणि स्विगीचे 44 कोटी बीसीसीआयच्या झोळीत पडणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या वक्तव्याचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, “हे ब्रँड म्हणून आयपीएलचे मूल्य दर्शवते. हे नवीन प्रायोजक आल्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. मी आकडेवारीवर भाष्य करणार नाही, पण आयपीएल 2022 मध्ये आम्ही आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणार आहोत.

Tata, Rupay आणि Swiggy व्यतिरिक्त, नवीन हंगामातील इतर प्रमुख प्रायोजक कंपन्या आहेत. ज्या गेल्या काही वर्षांपासून बोर्डवर आहेत, ज्यात Dream XI, Paytm, CEAT, Unacademy सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

10 संघ, 74 सामने

यावेळी 10 संघांसह आयपीएल खेळवली जात आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या लीगमध्ये दोन नवीन संघ सामील झाले आहेत. त्यामुळे फॉर्मेटमध्येही बदल करण्यात आला असून 10 संघांची 5-5 अशा दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. या वेळी स्पर्धेत अंतिम फेरीसह एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. साखळी टप्प्यातील 70 सामने मुंबईतील तीन आणि पुण्यातील एक स्टेडियमवर खेळवले जातील, ज्याची सुरुवात गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील संघर्षाने 26 मार्च रोजी होईल.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Technology Tips: एसीची कूलिंग घरबसल्या वाढवायची आहे? फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स

Raigad News: अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला प्रकरण, भरत गोगावलेंच्या मुलासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Life Success Tips : शहाणे असाल तर आयुष्यातील 'या' गोष्टी कधीच कुणालाही सांगू नका, अन्यथा पश्चाताप होईल

Baramati Lok Sabha Election: बारामती लोकसभा मतदारसंघात गृह मतदानासाठी उदंड प्रतिसाद, 228 मतदारांनी बजावला हक्क

Relation Tips: नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी करा 'या' नियमांचे पालन

SCROLL FOR NEXT