INDW vs NZW
INDW vs NZWSaam TV

INDW vs NZW: हरमनप्रीतचा डाव फसला, न्यूझीलंडकडून भारताचा पराभव

याआधी भारतीय संघाने इथे दोन सामने गमावले आहेत.

आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women World Cup 2022) मध्ये भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. न्यूझीलंडने भारताचा 62 धावांनी पराभव केला. या स्पर्धेत आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यांमधला भारताचा हा पहिलाच पराभव आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडने आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांमध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांमधला भारताचा हा तिसरा पराभव आहे. याआधी भारताला दोन सामने गमावावे लागले आहेत. त्याचवेळी, आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा हॅमिल्टनमधील सेडन पार्कवरचा हा 5वा विजय आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मैदानावर न्यूझीलंडच्या महिला संघाने प्रथमच स्कोअरचा बचाव करताना विजय मिळवला आहे.

हॅमिल्टनमध्ये न्यूझीलंडने भारतासमोर 261 धावांचे लक्ष्य ठेवले होते. खेळपट्टी फलंदाजीसाठी पुरक होती, त्यामुळे लक्ष्य फारसे अवघड वाटत नव्हते. पण, न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आपल्या भेदक गोलंदाजीने भारताला विजयापासून दूर ठेवले. भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध 200 धावांचा टप्पाही गाठता आला नाही आणि अवघ्या 198 धावा करून संघ बाद झाला. अशा प्रकारे भारत सामना 62 धावांनी हरला.

सामन्यात 261 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या विकेट्स ठराविक अंतराने पडतच होत्या. हरमनप्रीत कौर वगळता संघाच्या एकाही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. हरमनने 63 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 71 धावा केल्या. त्याच्यानंतर 31 धावांची खेळी करणारी मिताली राज ही संघाची दुसरी यशस्वी फलंदाज ठरली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com