IPL 2021 Twitter/ @IPL
Sports

IPL 2021: ऑस्ट्रलियाचे सात खेळाडू परतणार? 15 जुलैला BCCI घेणार निर्णय

आयपीएल फ्रँचायझींसाठी ही चांगली बातमी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑस्ट्रेलियामधील (IPL) सध्याच्या परिस्थितीत, डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि ग्लेन मॅक्सवेलसह (Glen Maxwell) बहुतेक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू युएईमध्ये (UAE) आयपीएल 2021 साठी उपलब्ध होणार आहेत. बायो बबलच्या थकव्याचे कारण देत ऑस्ट्रेलियाचे आयपीएलमधील सिताके वेस्ट इंडीज आणि बांगलादेश दौर्‍यापासून दूर राहिले. त्यानंतर टी- 20 कर्णधार अ‍ॅरोन फिंचसह अनेक दिग्गजांनीही याचा तीव्र निषेध केला आहे. तथापि, पॅट कमिन्स अनुपलब्ध आहे. कारण त्याने या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय आधीच सांगितला आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील औट्रेलियाचे सात खेळाडू डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, झ्ये रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टोइनिस आणि डॅनियल सॅम यांनी काही कारणांमुळे वेस्ट इंडीज आणि बांगलादेश दौर्‍यावरुन माघार घेण्याची घोषणा केली आहे. आगामी दौऱ्यासाठी अनुपस्थित राहणे हे संघाच्या संघाच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. कारण आगामी टी-20 विश्वचषकासाठी दुसरे खेळाडू आपल्याला संघात घ्या म्हणून दावा करतील.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, ग्लेन मॅक्सवेल, झ्ये रिचर्डसन, केन रिचर्डसन, मार्कस स्टोइनिस आणि डॅनियल सॅम हे सर्वजण वेस्ट इंडीज दौर्‍यातुन बाहेर पडल्यामुळे आयपीएलमध्ये परततील. ऑस्ट्रेलियन माध्यमांतील वृत्तानुसार, खेळाडूंचा असा विश्वास आहे की आयसीसी टी-20 विश्वचषकदेखील युएईमध्ये होत असल्याने आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा मेगा स्पर्धेच्या तयारीसाठी उत्तम संधी ठरेल. आयपीएल 2021 चे उर्वरित 31 सामने युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान खेळले जातील. आयपीएल फ्रँचायझींसाठी ही चांगली बातमी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

Maharashtra Live News Update: पुण्यातील देविका हाइट्स इमारतीच्या टेरेसवरील टॉवर केबिनला आग

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

SCROLL FOR NEXT