IPL 2021: 'उम्रान मलिक'ने फेकला या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू Twitter
Sports

IPL 2021: 'उम्रान मलिक'ने फेकला या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू

त्याने आरसीबीची फलंदाजी सुरु असताना 9 व्या षटकात 151-153 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली.

वृत्तसंस्था

सनरायझर्स हैदराबाद (SRH) युवा वेगवान गोलंदाज उम्रान मलिकने (Umran Malik) इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) चा सर्वात वेगवान चेंडू रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध बुधवारी अबू धाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर टाकला. त्याने आरसीबीची फलंदाजी सुरु असताना 9 व्या षटकात 151-153 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली.

उम्रान मलिकने 9 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर देवदत्त पडिक्कलविरुद्ध ही कामगिरी केली. आरसीबीच्या फलंदाजाने आयपीएल 2021 च्या सर्वात वेगवान चेंडूवर फलंदाजी केली. याआधी रविवारी रात्री उम्रान या आयपीएल हंगामातील पहिल्या 10 सर्वात वेगवान गोलंदाजांमध्ये प्रवेश करणारा पहिला भारतीय ठरला आहे. 21 वर्षीय खेळाडूने पहिल्याच षटकात 146 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकला तर नंतर त्याने 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली.

ANI शी बोलताना प्रशिक्षक रणधीर सिंह म्हणाले की, उम्रानची SRH निवड निवळ्ळ नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी झाली होती. टी नटराजनची COVID पॉझिटिव्ह चाचणी आल्यानंतर त्याला संघात घेण्याचं ठरलं. प्रशिक्षक म्हणाले की, केकेआरविरुद्धच्या सामन्यानंतर हा युवा गोलंदाज चर्चेचा विषय बनला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT