MI vs RCB: आज 'किंग कोहली' आणि 'हिटमॅन रोहित' आमने-सामने Saam TV
क्रीडा

MI vs RCB: आज 'किंग कोहली' आणि 'हिटमॅन रोहित' आमने-सामने

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला (RCB) शुक्रवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (CSK) पराभवाला सामोरे जावे लागले होते.

वृत्तसंस्था

IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला (RCB) शुक्रवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध (CSK) पराभवाला सामोरे जावे लागले होते. या पराभवासह विराट कोहलीच्या (Virat Kohli) संघाने यूएईमध्ये (UAE) सलग सातव्या पराभवाची नोंद केली आहे. दुसरीकडे, सीएसके आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (CSK vs KKR) सलग दोन पराभवांनंतर मुंबई इंडियन्सचा सामना रविवारी आरसीबीशी होणार आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या टप्प्यात दोन्ही संघांनी सलग दोन सामने गमावले आहेत आणि ते विजयाच्या शोधात आहेत. आयपीएलच्या मागील सामन्यांमध्ये पाच वेळा चॅम्पियन एमआयने आरसीबीवर वर्चस्व राखले आहे.

आज सुपर संडेची मजा दुप्पट होणार आहे. भारताचे दोन स्चार फलंदाज आज आमने सामने असणार आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्माचा संघ दिवसाच्या दुसऱ्या सामन्यासाठी आमनेसामने येणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स दोघांनाही विजयाची गरज आहे. सध्या आरसीबी गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे तर मुंबई सहाव्या स्थानावर आहे. गुणतालीकेत सध्या दिल्लीचा संघ 16 गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. तर चेन्नईचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

RCB संभाव्य संघ

विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, के.एस. भरत (यष्टिरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, वनिंदू हसरंगा, सचिन बेबी, केली जेमीसन, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल

मुंबईचा संभाव्य संघ

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, अॅडम मिल्ले, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT