Vaishanavi Sharma google
Sports

ICC Women's Under-19 T20 World Cup: भारताच्या वैष्णवी शर्माने रचला इतिहास; Under-19 वर्ल्ड कपमध्ये सुपरहिट कामगिरी

Vaishanavi Sharma Hatrick Record: Under-19 T20 विश्व चषक स्पर्धेत भारत विरुद्ध मलेशिया सामन्यात वैष्णवी शर्माने हॅटट्रिक घेत इतिहास रचला. या सामन्यात भारतानं मलेशियावर दणदणीत विजय मिळवला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आयसीसी अंडर १९ विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. क्वालालंपूर येथील बाय्युमास ओव्हल येथे ICC Under-19 महिला T20 विश्व चषक 2025 च्या भारत विरुद्ध मलेशिया सामन्यात भारताने यजमान मलेशियाचा पराभव केला. या सामन्यात भारतीय खेळाडू वैष्णवी शर्माने इतिहास रचला. Under-19 वर्ल्ड कप स्पर्धेत हॅटट्रिक घेणारी ती पहिली भारतीय तर जगातील तिसरी गोलंदाज ठरली.

मलेशियाविरुद्धच्या अ गटातील सामन्यात वैष्णवीने जबरदस्त कामगिरी केली. तिने ४ षटकांत ५ धावा देऊन ५ विकेट्स घेतले. त्यात एक मेडन ओव्हरचाही समावेश होता. वैष्णवीच्या दमदार कामगिरीमुळे भारताने मलेशियावर १० गडी राखून मोठा विजय नोंदवला. या स्पर्धेतील हा भारताचा सलग दुसरा विजय आहे. याआधी भारताने वेस्ट इंडीजचा नऊ गडी राखून विजय मिळवला होता.

वैष्णवी शर्माची दमदार कामगिरी

भारताकडून १४ वे षटक टाकण्यासाठी आलेली लेफ्ट हॅंड गोलंदाज वैष्णवी शर्माने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वेात्कृष्ट कामगिरी केली. षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर नूर एन बिंती रोसलानला (3) एलबीडब्ल्यू करत बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर नूर इस्मा दानियाला (0) एलबीडब्ल्यू बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर षटकाच्या चौथ्या चेंडूवर सिती नजवाहला (0) बोल्ड करुन हॅट्ट्रिक पूर्ण केली. यासह, महिला अंडर-19 T20 विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारी वैष्णवी भारताची पहिली आणि एकूण जगातील तिसरी गोलंदाज ठरली. आतापर्यंत या स्पर्धेच्या इतिहासातील कोणत्याही गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

मलेशियाच्या एकाही फलंदाजाने दुहेरी आकडा गाठला नाही

मलेशियासाठी कोणीही दुहेरी आकडा गाठू शकला नाही आणि यष्टिरक्षक फलंदाज नूर आलिया हेरुन आणि हुस्ना यांनी प्रत्येकी पाच धावा केल्या. भारताकडून वैष्णवीशिवाय आयुषी शुक्लाने तीन आणि जोशिता व्हीजेने एक विकेट घेतली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने अवघ्या 2.5 षटकांत बिनबाद 32 धावा करून सामना जिंकला. भारताकडून सलामीवीर गोंगडी त्रिसा २७ धावांवर नाबाद राहिली आणि जी कमलिनी ४ धावांवर नाबाद राहिली.

भारत विरुद्ध मलेशिया संघ India Vs Malaysia Icc Under 19 Team

भारत अंडर महिला संघ: गोंगडी त्रिशा, जी कमलिनी (wk), सानिका चाळके, निकी प्रसाद (c), भाविका अहिरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता VJ, पारुनिका सिसोदिया, शबनम मो. शकील, सोनम यादव, वैष्णवी शर्मा, धृती केसरी, आनंदिता किशोर

मलेशिया अंडर 19 महिला संघ: नूर आलिया हैरुन (wk), इर्दिना बेह नबिल, नजातुल हिदाय रझाली, सुआबिका मणिवन्नन, नूर इज्जातुल स्याफिका, नूर दानिया स्युहादा (क), नुरीमान हिदाय, नूर ऐन बिंती रोस्लान, नूर इस्मा दानिया, सिती नाझिया, सिती नाझ अब्दुल्ला, नूर आल्या नॉर्मिझान, नुनी फरीनी सफारी, नेसेरले येन अलिक

Edited By: Priyanka Mundinkeri

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day 2025 Live Update: पीएम मोदींनी सलग १२ व्यांदा लाल किल्ल्यावरून केलं ध्वजारोहण

Success Story: IIT,IIM मधून शिक्षण, लंडनमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS दिव्या मित्तल यांचा प्रवास

Maharashtra Politics : आंबेडकर-गांधी एकत्र लढणार? लोकशाही वाचवण्यासाठी 'वंचित'चं राहुल गांधींना पत्र, VIDEO

Fake Voter Scam : महाराष्ट्रातही व्होट चोरी? पैठणमध्ये 23 हजार मतदार बोगस? VIDEO

Friday Horoscope : भगवान श्रीकृष्णाची कृपा होणार; 5 राशींच्या लोकांच्या आयुष्यात भाग्यकारक घटना घडणार, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT