पाकिस्तानला भारताचा 'ब' संघही हरवू शकतो; दानिश कनेरियाची भविष्यावाणी  Saam Tv
Sports

पाकिस्तानला भारताचा 'ब' संघही हरवू शकतो; दानिश कनेरियाची भविष्यावाणी

पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनेरियाने (Danish Kaneria) श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळणार्‍या (IND vs SL) टीम इंडियाच्या (Team India) प्रयत्नांचे कौतुक केले आहे.

वृत्तसंस्था

पाकिस्तानचा माजी लेगस्पिनर दानिश कनेरियाने (Danish Kaneria) श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळणार्‍या (IND vs SL) टीम इंडियाच्या (Team India) प्रयत्नांचे कौतुक केले आहे. मेन इन ब्लूने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली आणि दीपक चाहर, पृथ्वी शॉ आणि ईशान किशन या खेळाडूंनी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली संधीचं सोनं केले. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिका जिंकली आहे. यासाठी माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने पाकिस्ताच्या संघाला लक्ष्य केले आहे.

कनेरियाने द्रविडच्या नेतृत्वात कुलदीप यादवच्या पुनरागमणाकडे लक्ष वेधले आणि फिरकीपटूचा आत्मविश्वास वाढवल्याबद्दल श्रेय दिले. क्रिकेटपटू-तज्ज्ञ डॅनिश कनिरियाने या भारतीय बी संघाचे कौतुक केले आहे. तो म्हणाला असे वाटते की ही भारताची बी टीम पाकिस्तानच्या मुख्या सघाला संघाला हरवेल. पुढे दानिश कनेरिया म्हणाला भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात आपला स्वाभाविक खेळ खेळला आणि विजय मिळवला.

दानिश कनेरिया यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, "हा भारतीय संघ ज्या प्रकारे कामगिरी करत आहे, राहुल द्रविडने भारतीय संघाबरोबर ज्या पद्धतीने काम केले आहे, ते सर्व प्रशंवसेस पात्र आहे. भारताची बी टीम पाकिस्तानच्या मुख्य संघाला नक्कीच पराभूत करु शकते असे कनेरिया म्हणाला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त भारत श्रीलंकेविरुद्ध तीन टी -२० सामनेदेखील खेळणार आहे. यावर्षी यूएईमध्ये होणाऱ्या आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी हे तीन सामने भारताचे शेवटचे मर्यादित षटकांचे सामने असतील.

पाकिस्तानच्या या माजी फिरकी गोलंदाजाने आपली भविष्यवाणी केली असून विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी त्याने भारत आणि वेस्ट इंडिजची निवड केली. टी -20 वर्ल्ड कपमध्ये हे दोन्ही संघांपैकी कोणी तरी एक विजयी होईल असा विश्वास कनेरियाला आहे. तो म्हणाला, आयपीएलचा भारत आणि वेस्ट इंडिज संघाला जास्त फायदा होईल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mosquitoes : दारू पिणारे डासांना चावायला आवडतात? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Manoj Jarange : 'मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा'; कुणी केली सरकारकडे मागणी? VIDEO

Liver Cancer Symptoms: तुम्हाला सामान्य वाटणारी ही लक्षणं असून शकतात लिव्हर कॅन्सरची; शरीराच्या 'या' बदलांवर लक्ष द्या

Pratap Sarnaik : 'मी हिंदी बोलतो, तुम्हीही बोला', सरनाईकांच्या हिंदी भाषिकांसाठी पायघड्या

Maratha Reservation : अखेर मराठा समाजाला मोठा दिलासा, उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT