indian women's cricket team won asia cup 2022 
क्रीडा

भारत आशिया कप 2022 जिंकला! स्मृती मानधनाची आक्रमक फिफ्टी, षटकार ठोकून श्रीलंकेचा केला पराभव

भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं श्रीलंकेच्या फलंदाजांना धावांचा सूर गवसला नाही.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : आशिया कप 2022 महिला क्रिकेटच्या रणधुमाळीत आज भारत आणि श्रीलंका यांच्यात निर्णायक अंतिम सामना झाला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय महिला संघांच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढं श्रीलंकेच्या फलंदाजांना धावांचा सूर गवसला नाही. त्यामुळे फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीमुळं श्रीलंकेला 20 षटकांत 9 विकेट्स गमावत फक्त 65 धावाच करता आल्या. दरम्यान, भारताला हा सामना जिंकण्यासाठी 66 धावांचं लक्ष्य गाठावं लागणार होतं. परंतु, भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या आक्रमक खेळीमुळं भारताने आशिया कप 2022 चं जेतेपद पटकावलं. मानधनाने आक्रमक खेळी करून 25 चेंडूत नाबाद 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर हरमनप्रीत 11 धावांवर नाबाद राहिली.

भारतीय महिला फलंदाजांनी दमदार कामगिरी करत आशिया कपमध्ये अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलं. भारताची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाने आक्रमक खेळी करत भारताची विजयाच्या दिशेनं वाटचाल केली. शेफाली वर्मा आणि जेमी बाद झाल्यानंतर मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारताची कमान सांभाळली. शेफाली वर्मा रणवीराच्या गोलंदाजीवर पाच धावांवर बाद झाली. तर श्रीलंकेची गोलंदाज दिलहारीने जेमीला अवघ्या दोन धावांवर क्लीन बोल्ड केलं.

भारताची गोलंदाज रेणुका सिंह आणि रिचा घोषने पॉवरप्लेमध्येच श्रीलंकेची कर्णधार चामरी अटापटूला अवघ्या 6 धावांवर बाद केलं. त्यानंतर रेणुकाने पुढील षटकात श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. श्रीलंकेची फलंदाज हर्षता मादवीला फक्त एक धावेवर पव्हेलियनचा रस्ता दाखवला.

विशेष म्हणजे रेणुकाच्या चौथ्या षटकात हर्षता बाद झाल्यानंतर लगेच चौथ्या चेंडूवर अनुष्का संजिवनीला तंबूत पाठवलं. पाचव्या चेंडूवर रेणुकाने हसिनी परेराला भोपळाही फोडू दिला नाही. परेरा शून्यावर बाद झाल्याने 9 धावांवरच श्रीलंकेचे चार फलंदाज बाद झाले. रेणुकाने सहाव्या षटकातही भेदक गोलंदाजी केली. तिने कविशा दिलहारीलाही एका धावेवर त्रिफळा उडवून बाद केलं. तसेच भारताची गोलंदाज राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्यानं श्रीलंकेची धावसंख्येला ब्रेक लावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT