INDw vs NZw ODI 
क्रीडा

INDw vs NZw ODI: भारतीय महिला संघाकडून न्युझीलंडला धोबीपछाड; ५९ धावांनी जिंकला सामना

IND vs NZ ODI: भारतीय महिला क्रिकेट संघाने न्युझीलंडच्या महिला संघाचा दारूण पराभव केलाय. भारतीय संघाने पहिल्या एकदिवशीय सामन्यात ५९ धावांनी किवी संघाचा पराभव केलाय.

Bharat Jadhav

भारतीय महिला संघ आणि न्युझीलंडच्या महिला संघात एकदिवशीय मालिकेचा पहिला सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने किवीच्या महिला संघाचा दारूण पराभव केला. हा सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. पहिलाच एकदिवशीय सामना भारतीय संघाने आपल्या नावावर केलाय. भारतीय संघाने ५९ धावांनी न्युझीलंडला नमवलं.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरशिवाय मैदानात उतरलेल्या भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यातही अनोखा पराक्रम केलाय. या सामन्यातील विजयासह भारतीय महिला संघ या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. या सामन्यात टीम इंडियाने एक विक्रम केला आहे. हरमनप्रीत ऐवजी स्मृती मंधानाकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. भारतीय महिला संघाने नाणेफेक जिंकून आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने ४४.३ षटकात २२७ धावा बनवत न्युझीलंडला २२८ धावांचे आव्हान दिले. परंतु भारतीय संघातील एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही.

भारताकडून तेजल बसब्रिस आणि दीप्ति शर्माने सर्वाधिक धावा केल्या. तेजल हसब्रिस यांनी सामन्यात ४२ धावा केल्या तर दीप्ती शर्माने ४१ धावा केल्या. तर न्युझीलंडकडून गोलंदाजी करताना अमेलिया केरन टी२० वर्ल्ड कपसारखा खेळ कायम ठेवत ४ विकेट घेतल्या.

आव्हानाचा पाठलाग करण्यात अपयशी

न्युझीलंडच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या २२८ धावा करायच्या होत्या. मात्र हे आव्हान पार करताना न्युझीलंडच्या संघाच्या नाकीनऊ आले. किवीचा संघ ४०.४ षटकात फक्त १६८ धावा करू शकला. ब्रुक हॅलीडेने सर्वात मोठी खेळी करत ३९ धावा केल्या. तर भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात कमालीचा खेळ दाखवत भारताला संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून राधा यादवने या सामन्यात ३ विकेट तर सायमा ठाकूरने २ विकेट घेतल्या. तर दीप्ती शर्मा आणि अरुंधती रेड्डी यांना एक-एक विकेट मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जागावाटपात शिंदेंची तडजोड नाही? सर्व्हेविरोधात एल्गार? दिल्लीवारीतून जागांचा तिढा सुटणार?

Sanjiv Khanna: संजीव खन्ना असतील देशाचे पुढील सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

Ramtek Assembly Constituency : रामटेकवरुन महाविकास आघाडीत रामायण? ठाकरेंकडून उमेदवारी,काँग्रेसच्या हालचाली, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार भारताचे सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबर रोजी घेतील शपथ

Congress First Candidate List : काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; देवेंद्र फडणवीसांविरोधात शिलेदार उतरवला, वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT