Sakshi Sunil Jadhav
नवरा बायकोचं नातं हे खूप सांभाळून ठेवावं लागतं. अन्यथा त्याचा शेवट हा वेगळा होऊनच होतो.
सुरुवातील प्रत्येकाला वाटतं आपला पार्टनर योग्य आहे, त्यामध्ये सगळ्या क्वालिटीस आहेत.
तुम्ही कधी असा विचार केलाय का? की, आपला पार्टनर परफेक्ट आहे का?
पुढे आपण मोटीवेशन स्पीकर जया किशोरी यांनी दिलेल्या रिलेशनशिपबद्दल जाणून घेऊ.
जया किशोरी यांच्या मते, परफेक्ट व्यक्ती ही कल्पना मुळात चुकीची असते.
सगळ्यांच गोष्टींमध्ये पार्टनर परफेक्ट नसतो. तुम्हाला काही काळासाठीच हा अनुभव घेता येतो. पुढे नात्यात गोष्टी परफेक्ट नसल्यावर भांडणं होतात.
रिलेशन तुटण्याचे हे एक महत्वाचे कारण असते. जे लोक सुरुवातीला स्विकारत नाहीत. म्हणूनच लोकांचं रिलेशन जास्त टिकत नाही.
जया किशोरी यांच्या मते, परफेक्ट पार्टनर नाही तर नात्यासाठी घेतलेली मेहनत परफेक्ट असते. त्यामुळे नातं टिकवण्यासाठी व्यक्तीमध्ये परफेक्ट गोष्टी शोधण्यापेक्षा त्यासाठी मेहनत घेणे खूप महत्वाचे आहे.