rohit sharma twitter
Sports

IND vs AUS: फॅन्सला नो एन्ट्री! BGT सुरु असताना घेतला मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

India vs Australia 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Ankush Dhavre

India vs Australia News In Marathi: बॉर्डर गावसकर ट्रॉफीत भारतीय संघ १-० ने आघाडीवर आहे. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी शानदार विजय मिळवला.

या विजयानंतर आता भारतीय संघ अॅडिलेडमध्ये होणारा दुसरा कसोटी सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्याआधी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

फॅन्सला नो एन्ट्री

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार अॅडिलेडमध्ये रंगणार आहे. हा डे- नाईट कसोटी सामना असणार आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकही डे-नाईट कसोटी सामना गमावलेला नाही.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाला हरवणं हे भारतीय संघासमोरील सर्वात मोठं आव्हान असणार आहे. गेल्या वेळी जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया डे- नाईट कसोटीसाठी आमनेसामने आले होते, त्यावेळी भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

त्यामुळे भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी कसून सराव करताना दिसून येत आहेत. भारतीय खेळाडूंना सराव करताना पाहण्यासाठी हजारो फॅन्स नेट्सच्या आजूबाजूला गर्दी करताना दिसून येत आहेत.

त्यामुळे खेळाडूंना सरावावर लक्ष केंद्रीत करता येत नाहीये. त्यामुळे मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील सर्व सामन्यांदरम्यान फॅन्सला भारतीय संघाचा सराव पाहण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

सराव करत असताना होणारा आवाज आणि नको असलेले कमेंट्स, याचा खेळाडूंना त्रास होतोय. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतीय संघ आघाडीवर

भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने २९५ धावांनी विजय मिळवला होता.

आता मालिकेतील दुसरा सामना येत्या ६ डिसेंबरपासून अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. भारतीय संघासाठी या मालिकेतील सर्व सामने महत्वाचे आहेत. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर भारतीय संघाला ही मालिका ४-० ने जिंकावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT