India vs West Indies 5th T20I: वेस्टइंडीविरूद्धची कसोटी आणि वनडे मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाला टी-२० मालिका गमवावी लागली आहे. वेस्टइंडीजने पलटवार करत टी-२० मालिकेत ३-२ ने विजय मिळवला आहे.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला शेवटच्या सामन्यात ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी भारतीय खेळाडूंची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले आहे.
राहुल द्रविडने सांगितलं पराभवाचं कारण...
या मालिकेसाठी भारतीय संघातील अनुभवी फलंदाजांना विश्रांती देण्यात आली होती. तर भारतीय संघातील खालच्या फळीतील फलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाही. टी-२० मालिकेसाठी अर्शदीप सिंग, मुकेश कुमार,युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फलंदाजांसह मैदानात उतरला होता.
तर अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याासाठी आला होता. निर्णायक सामन्यात भारतीय फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. या सामन्यात भारतीय संघाने २० षटकअखेर ९ गडी बाद १६५ धावा केल्या होत्या. (Latest sports updates)
काय म्हणाले राहुल द्रविड?
सामना झाल्यानंतर बोलताना राहुल द्रविड म्हणाले की, 'या मालिकेसाठी जो संघ मैदानात उतरला होता, त्या संघात आम्हाला प्रयोग करून पाहण्याची सुट मिळाली होती. माझं असं म्हणणं आहे की, काही क्षेत्रात आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो.फलंदाजीत खोली तयार करण्यावर आम्हाला भर द्यावा लागणार आहे. आम्ही संभव होईल तो प्रयत्न करतोय. आम्ही आमची गोलंदाजी कमकुवत करू शकत नाही मात्र त्याचवेळी आम्हाला फलंदाजीत खोली वाढवण्यावर देखील भर द्यावा लागणार आहे.'
भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार आणि तिलक वर्माला या मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या खेळाडूंची कामगिरी पाहुन राहुल द्रविड भलतेच खुश झाले आहेत. त्यांनी या खेळाडूंचे कौतुक करत म्हटले की,'मला असं वाटतं की, पदार्पण करणाऱ्या तिन्ही खेळाडूंनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली. यशस्वी जयस्वालने चौथ्या सामन्यात चांगली फलंदाजी केली. तिलक वर्माने मध्यक्रमात चांगली फलंदाजी केली. तो कठीण परिस्थिती असताना देखील फलंदाजीला आला होता. त्यावेळी त्याने सकारात्मक राहुन फलंदाजी केली.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.